Uddhav Thackeray Sabha Live : मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी राज्यात गेल्या महिन्याभरात घेतलेल्या तीन सभांच्या पार्श्वभूमीवर आज झालेल्या उद्धव ठाकरेंच्या सभेची उत्सुकता राजकीय वर्तुळात लागून राहिली होती. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यापासून पहिल्यांदाच अशा प्रकारे जाहीर सभा घेत असल्यामुळे या सभेत ते काय बोलणार? याविषयी मोठी चर्चा सुरू झाली होती. या सभेत बोलताना उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस, भाजपा, हिंदुत्व, राज ठाकरे, किरीट सोमय्या, केतकी चितळे अशा अनेक विषयांवर सडेतोड भूमिका मांडली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
महागाईवर कुणी बोलतच नाही. बऱ्यात दिवसांनी मोदींनी कोविडवर सभा घेतली. देशभरातले मुख्यमंत्री तिथे होते. मी आपला आयपीएल बघितल्यासारखा बघत होतो. मला त्या बैठकीत बोलायचं नव्हतं. सगळे बोलल्यानंतर पंतप्रधान समारोप करताना दिशा दाखवतात. मला वाटलं संपेल. मग अचानक त्यांनी कोविडवरचा उपाय सांगितला की पेट्रोल-डिझेलचे दर कमी करा – उद्धव ठाकरे</p>
मुंबईला तोडण्याचा यांचा मनसुबा वेळेत लक्षात घ्या. हे पोटातलं ओठात आलेलं वाक्य आहे – उद्धव ठाकरे
तेव्हा तुम्ही नव्हतात. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातही जनसंघ म्हणून होतात. तेव्हा शिवसेना नव्हती. पण बाळासाहेब ठाकरे आणि श्रीकांत ठाकरे माझे आजोबा प्रबोधनकार ठाकरेंना मदत करत होते. संयुक्त महाराष्ट्र समिती स्थापन झाली होती. मतभेद मिटवण्याचं आवाहन त्यांनी केलं. पण त्यातून पहिला फुटला जनसंघ. म्हणजे यांचे पूर्वीचे बाप. जागावाटपावरून भांडण करून फुटले. – उद्धव ठाकरे
ज्या जागेवर आपली सभा होतेय, इथे ते बुलेट ट्रेन आणत आहेत. आपण मागितली का बुलेट ट्रेन? झाली उद्या बुलेट ट्रेन, तरी आपल्यापैकी किती लोक जाणार तिकडे. हा मुंबई तोडण्याचा डाव चाललाय. मुंबई स्वतंत्र करणार म्हणजे काय? देश पारतंत्र्यात आहे का? मला फडणवीसांना प्रश्न विचारायचा आहे की स्वातंत्र्यपूर्व काळात संघ होता. पण एकदाही संघ स्वातंत्र्यलढ्यात उतरलेला नाही. असेल तर दाखले दाखवा. – उद्धव ठाकरे
आपण एक मे जेव्हा साजरा करत होतो, तेव्हा भाजपाची सभा होती. तेव्हा सभेत फडणवीस चुकून बोलून गेले, जे पोटात होतं ते ओठात आलं. त्यांच्या मालकाची इच्छा बोलून गेले की आम्ही मुंबई स्वतंत्र करणार. तुमच्या मालकासकट तुमच्या सतराशे साठ पिढ्या आल्या, तरी इथल्या मर्द मावळ्यामधे जिवंतपणा आहे. मुंबई आंदण म्हणून मिळालेली नाही, मिळवलेली आहे. मुंबईचा लचका तोडण्याचा जो प्रयत्न करेल, त्याचे तुकडे करू – उद्धव ठाकरे
इथे बसलेल्या हिंदुंमध्ये शिवसेना प्रमुखांनी जे रक्त पेरलं आहे, हा हिंदू मेल्या आईचं दूध प्यायलेला नाही. कुणाची बिशाद आहे बघतो ना हिंदुत्वावर घाला घालण्याची. – उद्धव ठाकरे
आमचं हिंदुत्व गधाधारी होतं, पण अडीच वर्षांपूर्वी आम्ही तुम्हाला सोडलं. आम्ही गध्याला सोडून दिलं. कारण काही उपयोग नाही त्याचा. जी गाढवं आमच्यासोबत घोड्याच्या आवेशात आमच्यासोबत होती, त्या गाढवानं आम्हाला लाथ मारायच्या आधीच आम्ही त्याला लाथ मारली. बसा बोंबलत – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
हल्ली खोटा हिंदुत्वाचा बुरखा घातलेला पक्ष आपल्यासोबत होता, ते देशाची दिशा भरकटवत आहेत. मी मध्ये बोललो होतो की आमचं हिंदुत्व शिवसेनाप्रमुखांनी आम्हाला शिकवलं आहे. ते म्हणाले मला देवळात घंटा बडवणारा हिंदू नको, अतिरेक्यांना बडवणारा हिंदू पाहिजे. तोच धागा घेऊन आपण िपुढे जातोय. आपलं हिंदुत्व गदाधारी आहे, इतरांचं घंटाधारी आहे. बसा बडवत घंटा. काय मिळालं, घंटा. – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
ज्यांना महाराष्ट्रात राहून महाराष्ट्र म्हणजे काय हे ओळखता आलं नाही, त्यांच्यासाठी मध्ये मध्ये बोलावं लागतं. – – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
जमलेल्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो.. तुमच्याप्रमाणे मलाही मोकळं वाटतंय जरा. बऱ्याच दिवसांनी मैदानात उतरलोय. अनेक विषयांवर बोलायचंय. – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
१५ जूनला शिवसेनेचा अयोध्या दौरा, संजय राऊतांची घोषणा!
काश्मीरमध्ये पुन्हा एकदा धोक्याची घंटा वाजतेय हे लक्षात घ्या. हिंदुत्व धोक्यात कुणामुळे आलंय हे तपासायची गरज निर्माण झाली आहे. शिवसेनेवर बोटं दाखवू नका, शाहिस्तेखानाप्रमाणे तुमचीही बोटं छाटली जातील एवढी ताकद शिवसेनेत आहे – संजय राऊत
आज काश्मीरमधला हिंदू सगळ्यात जास्त धोक्यात आहे. गेल्या ३ महिन्यात २७ कश्मिरी पंडितांची हत्या झाली आहे. परवा दुपारी ३ वाजता राहुल भट या सरकारी कर्मचाऱ्याच्या कार्यालयात अतिरेकी घुसले, सगळ्यांसमोर त्याला गोळ्या घातल्या आणि अतिरेकी निघून गेले. आज आणि काल कश्मिरी पंडित हत्येचा निषेध करण्यासाठी रस्त्यावर उतरले, तेव्हा केंद्राच्या पोलिसांनी त्यांच्यावर अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या – – संजय राऊत
औरंगजेबाचा जन्म गुजरातमध्ये झाला. छत्रपती शिवाजी महाराज आमच्या महाराष्ट्रात जन्माला आले. महाराष्ट्रात सातत्याने आक्रमणं का होत आहेत. गुजरात आणि महाराष्ट्रात जन्मलेल्यांमध्ये हा संघर्ष सुरू आहे. जे छत्रपतींनी तेव्हा भोगलं, ते महाराष्ट्र आज भोगतोय.
औरंगाबादमध्ये औरंगजेबाच्या कबरीपुढे ओवैसी गुडघे टेकतो हा महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा अपमान आहे. पण ताबडतोब भाजपाची पिलावळ उठली आणि त्यांनी सरकारला स्वाभिमान आहे की नाही? असा प्रश्न केला. मी सांगतो, २०१४ पासून ओवेसी महाराष्ट्रात येत आहे. काँग्रेसच्या काळात, फडणवीसांच्या काळात आत्तापर्यंत किमान २० वेळा तो औरंगजेबाच्या कबरीपुढे गेला, तेव्हा हा महाराष्ट्राचा अपमान वाटला नाही का? – संजय राऊत
हिंदवी स्वराज्य छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलं. ते नष्ट करू पाहाणाऱ्या औरंगजेबाशी संभाजी महाराजांनी लढा दिला. शिवसेनेचं हिंदुत्व त्या छत्रपती संभाजीराजांसारखं आहे. धर्मासाठी, देशासाठी प्राण जाए, पर वचन ना जाए. हिंदुत्वाचा पराभव होऊ देणार नाही. – संजय राऊत
इथल्या सगळ्या लोकांनी हनुमान चालीसा वाचायला सुरुवात केली, तर लडाखमध्ये घुसलेलं चीनचं सैन्य पळून गेल्याशिवाय राहणार नाही एवढी ताकद या जनसागरात आहे – संजय राऊत
आजची सभा सांगतेय की मुंबईचा बाप फक्त शिवसेना आहे. आणि आमचा बाप एकच, बाळासाहेब ठाकरे – – संजय राऊत
आपल्या तोफा नेहमी धडाडत असतात. पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे खूप मोठा दारूगोळा घेऊन वर येणार आहेत. खऱ्या तोफा काय आहेत हे महाराष्ट्राला पुढच्या पाच मिनिटांत कळेल. वांद्र्यात सुरू झालेल्या सभेचं शेवटचं टोक कुर्ल्यात आहे. – संजय राऊत
आपलं हिंदुत्व हेच आहे की जी वचनं आपण देतो, ती पूर्ण करतो. पण एकच सांगतो, रघुकुल रीत सदा चली आए, प्राण जाए पर वचन ना जाए – आदित्य ठाकरे</p>
महाविकास आघाडीच्या सरकारला बळ कसं द्यायचं, याचा विचार आपण करायला हवा. मी ३१ वर्षांचा युवा म्हणून मला विचारायचं आहे की देशात जिथे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत, महागाई, बेरोजगारी, जातीय तेढ असे प्रश्न आहेत. अशा वेळी तुम्ही कोणतं सरकार निवडणार आहे? घर पेटवणारं की चूल पेटवणारं? – आदित्य ठाकरे
महाविकास आघाडीच्या सरकारला अडीच वर्ष होत आली आहेत. पण सतत देशातल्या टॉप ५ मुख्यमंत्र्यांमध्ये दोन वेळा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आले आहेत. महाराष्ट्राचा नागरिक म्हणून हे कौतुक करायचं आहे. – आदित्य ठाकरे
प्रत्येक जिल्ह्यात मी गेलो, तेव्हा जे आशीर्वाद घेऊन आम्ही महाविकास आघाडीचं सरकार स्थापन केलं. दोन वर्ष कोविडचा काळ लोटल्यानंतर पहिल्यांदा अशी ही आपली सभा होत आहे.
माझ्याकडे बोलायला शब्द नाहीत. येताना मी गर्दी बघत होतो. इथे पहिली रांग वांद्र्यात असेल, तर मागची रांग कुर्ल्यात पोहोचली आहे एवढी तुफान गर्दी आहे.
बीकेसीमध्ये उद्धव ठाकरेंच्या सभेसाठी प्रचंड गर्दी!