नवरात्रोत्सव येत असून प्रत्येक घरात घटनस्थापनेच्या पार्श्वभूमीवर साफसफाई सुरू आहे. मात्र साफसफाई करत असताना आपण बेसावध राहणं जीवावर बेतू शकतं. कारण असं की बारामतीमधील जवाहर नगर येथे स्वप्नील आणि त्याची आई सुमन शिंदे या साफसफाई करत होत्या. तेव्हा, बाकड्यावर ठेवलेल्या एका पिशवीखाली बसलेल्या सापाला धक्का लागला अन फुत्कारा मारून तो एकटक त्यांच्याकडे पाहू लागला. घटनेमुळे शिंदे कुटुंब घाबरून गेलं होतं.
तातडीने सर्पमित्र अमोल जाधव यांना बोलवून मोठ्या शिताफीने सापाला पकडून त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आलं आहे. संबंधित साप हा इंडियन्स स्पेक्टिकल कोब्रा जातीचा असून चार फूट लांब होता. सध्या तरी साफसफाई करत असताना घरातील महिला आणि तरुणांनी काळजी घ्यावी असंच या घटनेवरून अधोरेखित होत आहे. 

Story img Loader