गुलाबी थंडीचे शानदार आगमन झाले असतानाच काल अचानक बोचरी थंडी गायब झाली आणि आज संध्याकाळी अनेक ठिकाणी वळवाच्या पावसासारखे तुषार कोसळले. त्यामुळे बागायतदार चिंताग्रस्त बनले आहेत. दिवाळीपूर्वी थंडीचे आगमन होते, पण गेल्या काही वर्षांत उन्हाळा, हिवाळा व पावसाळा या तिन्ही ऋतूंचे दर्शन एकाच हंगामात पाहावे लागत आहे. या बदलत्या पर्यावरणीय हवामानाचा खेळ शेतकरी व बागायतदारांच्या चिंतेचा बनला आहे.
यंदा गुलाबी बोचऱ्या थंडीचे आगमन झाले. त्यानंतर गेला आठवडाभर या थंडीचे आगमन सर्वानाच सुखावह वाटत होते, पण काल अचानक थंडी गायब झाली आणि आज दुपारी वळवाच्या पावसासारखे तुषार अनेक ठिकाणी पडले.या अवेळी कोसळलेल्या पावसाचा आंबा व काजू बागायतींना फटका बसण्याची भीती आहे. उशिराने हंगाम सुरू होत असतानाच बोचऱ्या थंडीने चकवा दिल्याने चिंतेचे वातावरण आहे.
या हंगामात तिन्ही ऋतूंचे आगमन बागायतींना धोका देणारे ठरत आहे. या पर्यावरणीय बदलाच्या अभ्यासाची गरज आहे. आंबा कलमांना पालवी फुटल्याने हंगाम उशिरा येण्याची भीती असतानाच अनेक ठिकाणी पावसाचा शिडकावा झाल्याने बागायतदारांत चिंता निर्माण झाली आहे. यंदा आंबा, काजू उशिराने येण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
थंडी व पावसाच्या शिडकाव्याने बागायतदार चिंताग्रस्त
गुलाबी थंडीचे शानदार आगमन झाले असतानाच काल अचानक बोचरी थंडी गायब झाली आणि आज संध्याकाळी अनेक ठिकाणी वळवाच्या पावसासारखे तुषार कोसळले. त्यामुळे बागायतदार चिंताग्रस्त बनले आहेत.
First published on: 24-11-2012 at 04:03 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cold and rain reason to worry farmer of kokan