सातारा नगरपालिकेच्या हद्दीत झालेल्या अनधिकृत बांधकांमांकडून २१ लाखांवर दंड नगरपालिकेने वसूल केल्याची माहिती मुख्याधिकारी अभिजित बापट यांच्याकडून मिळाली. पालिकेने ४१९ अनधिकृत बांधकामांची यादी तयार केली असून त्यापकी ८९ कामांवर कारवाई केल्याचे सांगण्यात आले.
सातारा  शहरातील अनधिकृत बांधकामांविरोधात सामाजिक कार्यकत्रे सुशांत मोरे यांनी नोव्हेंबर महिन्यांत उपोषण केले होते.आ.शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी मोरे यांना या बाबत कारवाईचे आश्वासन देऊन उपोषण सोडण्याची विनंती केल्यावर उपोषण सोडण्यात आले होते.मात्र त्यानंतर महिनाभर अतिक्रमण काढण्याबाबत फारशी ठोस कारवाई न केल्याने मोरे यांनी पुन्हा उपोषणाची नोटीस देत उच्च न्यायालयात जाण्याचा इशारा दिला होता. त्यावर मुख्याधिका-यांनी मोरे यांच्याशी चर्चा करून अतिक्रमणे काढण्याचा कालबध्द कार्यक्रम आखत असल्याचे सांगितले. त्या नुसार ८९ जणांना नोटीस बजावण्यात आल्या असून शासनाला त्या पोटी २१ लाख १८ हजार ३९९ रुपये इतकी रक्कम दंडस्वरूपात मिळाली आहे.पार्किंग किंवा बेसमेंट वापरासंदर्भात ९ जणांना नोटीस देण्यात आल्या आहेत. एकूण २३९ अनधिकृत तर ७२ बेसमेंट सील करण्याची कारवाई पालिकेने सुरू केली आहे, अशी माहिती बापट यांनी दिली.
मोरे यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले, पालिकेने सहा महिने अतिक्रमणे काढण्यासाठी मुदत मागितली आहे. ती त्यांनी पाळावी अन्यथा मी उच्च न्यायालयात जाऊन न्याय मागीन. या काळात प्रशासनाने आपले काम निर्भयपणे करावे. अन्यथा जबाबदार अधिकारी आणि लोकप्रतिनिधींना मी धडा शिकवल्याशिवाय राहाणार नाही.

Story img Loader