राज्य सरकारने  प्रशासनात मोठ्याप्रमाणात फेरबदल करताना २० सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. कोल्हापूर, हिंगोली, अकोला, परभणी, जालना आदी जिल्हाधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. दरम्यान, परभणीच्या जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती झालेल्या आयएएस आधिकारी आंचल गोयल यांना रुजू होण्यापुर्वीचं माघारी परतावे लागले. त्यामुळे राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. यासाठी शिवसेना खासदाराने थेट मंत्रायात लॉबिंग केल्याची चर्चा आहे.

आयएएस आधिकारी आंचल गोयल यांनी परभणीच्या जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती झाली होती. मात्र आचल गोयल यांच्यासाठी नागरिक रस्यावर उतरले असून आंदोलन करत आहेत.

या प्रकरणावर पालकमंत्री नवाब मलिक म्हणाले, “जिल्हाधिकारी कोण असावा हे मी ठरवत नाही, आंचल गोयल मला बोलूनच परभणीमध्ये गेल्या होत्या. पण त्यांना का रुजू होऊ दिलं नाही याबद्दल मला माहिती नाही. आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारितून होतात. जीएडी मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारीत आहे. काही अज्ञानी आणि लोक माझ्यावर आरोप करत आहेत ते चुकीचे आहेत”