मैत्रिणींकडून होणाऱ्या सततच्या त्रासाला वैतागून महाविद्यालयीन विद्यार्थिनीने गळफास घेतल्याची घटना शहरापासून जवळच असलेल्या डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाच्या वसतीगृहात घडली आहे. याप्रकरणी नशिराबाद पोलिसांनी संशयित मुलींची चौकशी केली आहे.
डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात पश्चिम बंगालच्या पुरूलिया जिल्ह्यातील कुयरीपारा येथील प्रियंका नमन मुखर्जी (१९) ही विद्यार्थी प्रथम वर्षांत शिकत होती. या विद्यार्थिनीने शनिवारी मध्यरात्री वसतीगृहात ओढणीने गळफास घेतला. घटनास्थळी पोलिसांना प्रियंकाने लिहिलेली चिठ्ठी सापडली असून त्यात तिने आपल्या सोबत राहणाऱ्या तिघा मैत्रिणींकडून होणाऱ्या त्रासाचा उल्लेख केला आहे. या मैत्रिणींनी आपल्या आकांक्षा, कारकीर्द उद्ध्वस्त केल्याने आपण आत्महत्या करत असल्याचे तिने म्हटले आहे.

Story img Loader