सीमेवरील भारतीय जवानांची पाकिस्तानने केलेल्या निर्घृण हत्येनंतर देशभरातून संतप्त प्रतिक्रिया येत असताना ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनीही याबाबत तीव्र संताप व्यक्त केला. ‘‘पाकिस्तानचा हा भ्याड हल्ला आहे. पाकिस्तानी कलाकारांचे आपण नेहमी चांगल्या भावनेने स्वागत करतो, पण पाकिस्तानला त्या भावनांचा आदर नाही. त्यामुळे यापुढे भारतात पाकिस्तानी कलाकारांचे स्वागत होऊ नये, असे मला वाटते,’’ असे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले. ‘माई’ या हिंदी चित्रपटाच्या प्रमोशनच्या निमित्ताने पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत आशा भोसले यांनी मत व्यक्त केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Colours changed by ashatai