Comedian Kunal Kamra News : प्रसिद्ध स्टॅण्डअप कॉमेडिअन कुणाल कामरा याने राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची एका गाण्यामार्फत विडंबन केले. या गाण्यात त्याने एकनाथ शिंदेंचा उल्लेख गद्दार असा केला आहे. हे गाणं सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर शिंदेंची शिवसेना प्रचंड आक्रमक झाली. शिंदेच्या शिवसेनेचे पदाधिकारी कुणाल सरमळकर आणि राहुल कनाल यांनी खार येथील दि हॅबिटेट स्टुडिओमध्ये तोडफोड केली. याप्रकरणी राहुल कनाल आणि कुणाल सरमळकर यांना पोलिसांनी चौकशीसाठी बोलावलं आहे. दरम्यान, काल रात्रीपासून हा प्रकार सुरू असताना कुणाल कामरानेही एक सुचक ट्वीट केलं आहे.
“महाराष्ट्र इलेक्शन में इन्होने जो किया है बोलना पडेगा. यहांपे पहले इन्होने क्या किया? शिवसेना बीजेपीसे बाहर आ गयी. उसके बाद शिवसेना शिवसेनासे बाहर आ गयी, एनसीपी एनसीपी बाहर आ गयी. एक व्होटर को नौ बटन दे दिये. सब कन्फ्युज हो गये. चालू एक जन ने किया था. वो मुंबईमें एक बहोत बढिया डिस्ट्रिक्ट है थाने. वहाँ से आते है..” असं कुणाल कामरा म्हणतो आणि गाणं सुरु करतो. या गाण्याला ‘भोली सी सुरत’ या ‘दिल तो पागल है’ या चित्रपटातील गाण्याची चाल आहे. या चालीवर तो म्हणतो ‘मेरी नजर से तुम देखो तो गद्दार नजर वो आये’. हा कुणाल कामराचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे. दरम्यान, शिवसेनेचे आमदार मुराजी पटेल यांनी दाखल केलेल्या तक्रारीवरून कामराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, या प्रकरणी गदारोळ झाल्यानंतर कुणाल कामराने संविधानाचा फोटो ट्वीट केला आहे. संविधानाचा फोटो पोस्ट करून “पुढे जाण्याचा एकमेव मार्ग”, असं कॅप्शन कुणाल कामराने लिहिलं आहे. दरम्यान, त्याच्या पोस्टवरही अनेकांनी त्याच्यावर टीका केली आहे. संजय राऊतांना बुलडोझर गिफ्ट करतानाचा एक फोटो अनेकांनी त्याच्या कमेंट बॉक्समध्ये शेअर केला असून आता तुला संविधानाची आठवण आली का? असा प्रश्न कुणाल कामराने विचारला आहे.
The only way forward… pic.twitter.com/nfVFZz7MtY
— Kunal Kamra (@kunalkamra88) March 23, 2025
कुणालचं गाणं व्हायरल होताच संजय राऊतांनी त्याच्या समर्थनार्थ पोस्ट केली होती. कुणाल की कमाल, जय महाराष्ट्र असं म्हणत संजय राऊतांनी कुणाल कामराचं कौतुक केलं होतं. तर, शिंदेंचे नेते संजय निरुपम यांनी कुणाल कामराला धमकी दिली आहे. आज सकाळी ११ वाजता ते कुणाल कामराची धुलाई करणार आहेत, असं निरुपम यांनी म्हटलंय.
Maharashtra ❤️❤️❤️ pic.twitter.com/FYaL8tnT1R
— Kunal Kamra (@kunalkamra88) March 23, 2025
कुणाल कामराने घेतलं नाही एकनाथ शिंदेंचं नाव पण…
कॉमेडियन कुणाल कामराने संपूर्ण व्हिडीओमध्ये किंवा गाण्यात एकनाथ शिंदे यांचं नाव कुठेच घेतलेलं नाही. मात्र जे गाणं म्हटलं आहे आणि त्यात जे वर्णन केलं आहे त्यावरुन कुणाल कामरा एकनाथ शिंदेंबाबतच बोलतो आहे हे स्पष्ट होतं आहे. त्यामुळे आता कुणाल कामराच्या अडचणी वाढण्याची चिन्हं आहेत.