Kunal Kamra Eknath Shinde Controversy प्रसिद्ध स्टॅण्डअप कॉमेडिअन कुणाल कामरा याने त्याच्या मुंबईतीली एका कार्यक्रमात राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली. त्यांच्यावर विडंबनात्मक गाणं तयार करून सादर केले गेले. त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून शिवसेनेचे समर्थक प्रचंड आक्रमक झाले आहेत. व्हिडिओ व्हायरल होताच शिवसेनेच्या समर्थकांनी कार्यक्रमस्थळी जाऊन तोडफोड केली. खार येथील युनीकॉन्टिनेंटल हॉटेलमधील द हॅबिटॅट क्लबमध्ये हा कार्यक्रम झाला. या ठिकाणी जाऊन कार्यकर्त्यांनी धुडगुस घातला. याप्रकरणी आता शिवसेनेच्या समर्थकांवरही कारवाई सुरू असून कुणाल कामराविरोधातही अंधेरी येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याचं वृत्त आहे.

आज दिवसभरात हा मुद्दा चर्चेत राहणार असून विधानसभेतही याचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे. याविषयी अधिक अपडेट जाणून घेऊयात.

Live Updates
15:28 (IST) 24 Mar 2025

कुणाल कामराचं गाणं सुषमा अंधारेंनीही गायलं; म्हणाल्या, "चला भक्तांनो..."

https://www.facebook.com/share/r/18ndzxkM3H/

13:56 (IST) 24 Mar 2025

"कुणाल कामराने कोणाचंही नाव घेतलं नाही, मग गद्दार आणि चोर कोण?" आदित्य ठाकरेंचा रोखठोक प्रश्न

मला वाईट याचं वाटतं की एकनाथ शिदेंच्याच कार्यकर्त्यांनी ठरवून दिलं की गद्दार आणि चोर म्हणजे एकनाथ शिंदेच. कारण, कुणाल कामराने नाव कोणाचंही घेतलं नव्हतं. मग त्यांना मिरची लागायचं कारणच नव्हतं. पण त्यांनी ठरवंलय की आपला बॉस गद्दार आणि चोर आहे - आदित्य ठाकरे, आमदार

कुणाल कामराने कोणाची माफी मागावी? एकनाथ शिंदे चोर आणि गद्दार आहेत हे देवेंद्र फडणवीसांना मान्य आहे का? मी जेव्हा तो व्हिडिओ पाहिला तेव्हा मला माहीत नव्हतं की कुणाल कामरा कोणाबद्दल बोलतोय - आदित्य ठाकरे, आमदार

13:17 (IST) 24 Mar 2025

युवानेते सरचिटणीस राहुल कनाल पोलिसांच्या ताब्यात, आज कोर्टात हजर करणार

युवानेते सरचिटणीस राहुल कनाल पोलिसांच्या ताब्यात, आज कोर्टात हजर करणार.

https://twitter.com/AHindinews/status/1904077129027084580

12:46 (IST) 24 Mar 2025
कुणाल कामराचा उल्लेख अर्बन नक्षल; देवेंद्र फडणवीस विधानसभेत म्हणाले, "डाव्या विचारसरणीचे..."

आमच्यावर कविता करा, आम्ही टाळ्या वाजवू. पण सुपारी घेऊन कोणी अपमानित करत असेल तर कारवाई केली जाईल. या गोष्टी या महाराष्ट्रात सहन करणार नाही. काहीही झालं तरीही विनाकारण प्रसिद्ध मिळवण्याकरता सुपाऱ्या घेऊन बोलणाऱ्यांना धडा शिकवावा लागेल. स्टॅण्डअप कॉमेडी आम्हाला आवडते, त्याला दादही देतो. अलहाबादियालाही आम्ही सोडलं नाही. स्वातंत्र्याचा स्वैराचार झाला आणि आपण गप्प बसलो तर पुढच्या पिढ्या माफ करणार नाही. याप्रकरणी कडक कायदेशीर कारवाई केली जाईल, कोणीही कितीही दबाव आणला तरी कारवाई होईल. डाव्या विचारसरणीचे किंवा अर्बन नक्षल म्हणा, समाजातील मानकांना अपमानित करणं, देशातील संस्थांना अपमानित करणं, देशाच्या यंत्रणांवरून विश्वास उठला पाहिजे, अशी कामं करणाऱ्यांना सोडणार नाही - देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

https://www.youtube.com/watch?v=hCA9QruCb60

12:41 (IST) 24 Mar 2025

वाद निर्माण करून प्रसिद्धी मिळवण्याचा हव्यास - देवेंद्र फडणवीस

वाद निर्माण करून प्रसिद्धी मिळवण्याचा हव्यास आहे. एकनाथ शिंदे यांना टार्गेट करत अतिशय खालच्या दर्जाचा विनोद करण्याचा प्रयत्न केला. कामराला हे माहिती पाहिजे की २०२४ च्या निवडणुकीने सांगून दिलं की कोण गद्दार आणि कोण खुद्दार आहे. हा महाराष्ट्राच्या जनतेपेक्षा मोठा आहे का? - देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

12:15 (IST) 24 Mar 2025

फहिम खानच्या कुटूंबीयांनी रात्रीच घर सोडले , अनुपस्थितीत कारवाई

नागपूर महापालिका प्रशासनाने फहीम खानच्या घर बुलडोझरने पडण्याची कारवाई सोमवारी सकाळी सुरू केली. महापालिकेने काल त्याच्या घरावर अनधिकृत बांधकाम काढून घेण्याची नोटीस बजावली होती. २४ तासांची मुदत देण्यात आली होती. महापालिकेची नोटीस बाजवल्यातर फहिम खानचे कुटूंबीय भयभीत झाले. ते काल रात्री घरून निघून गेले, असे सांगण्यात येत आहे.

सविस्तर बातमी...

11:20 (IST) 24 Mar 2025

कुणाल कामरा हा काँग्रेसच्या इकोसिस्टमचा भाग - संजय निरुपम

कुणाल कामरा काँग्रेसच्या इकोसिस्टिमचा भाग आहे. तो राहुल गांधींबरोबर पदयात्रा करतो आणि सुप्रिया सुळे व शरद पवारांबरोबरही दिसतो - संजय निरुपम

11:14 (IST) 24 Mar 2025
"कुणाल कामराने माफी मागितली पाहिजे, संविधानाचं पुस्तक दाखवून...", देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया

स्टॅण्डअप कॉमेडी करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे, पण स्वातंत्र्याचा स्वैराचार करण्याचा अधिकार कोणालाही नाही. कोण गद्दार आहे आणि कोण खुद्दार आहे हे जनतेने २०२४ साली दाखवलं आहे. राज्यातील माजी मुख्यमंत्री, आताचे उपमुख्यमंत्री, राज्याचे वरिष्ठ नेत्याचा अनादर करण्याचा अधिकार कोणालाही नाही. तुम्ही व्यंग करा, पण अपमानित करण्याचा काम कोणी करेल तर हे सहन केलं जाणार नाही. कामरांनी माफी मागितली पाहिजे, ते जे संविधानाचं पुस्तक दाखवत आहेत, ते जर त्यांनी वाचलं असेल तर संविधानानेच सांगितलं आहे की स्वातंत्र्याचा स्वैराचार करता येणार नाही, दुसऱ्यांच्या स्वातंत्र्यांवर अतिक्रमण करता येणार नाही - देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

10:54 (IST) 24 Mar 2025

“कुणाल कामरा दिशा सालियन प्रकरणावरून लोकांचं लक्ष विचलित करण्यासाठी…”, राम कदमांचा दावा

प्रसिद्ध स्टॅण्डअप कॉमेडियन कुणाल कामरा याने एक विडंबनात्मक कविता सादर करून राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली होती. यावरून आता शिंदे गटाचे नेते व कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी ज्या ठिकाणी कुणाल कामरा याचा कार्यक्रम झाला त्या हॉटेलची तोडफोड केली आहे. पोलीस आता या तोडफोड करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या मागावर आहेत. दरम्यान, कुणाल कामराच्या कवितेवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. भाजपा आमदार राम कदम यांनी म्हटलं आहे की “कुणाल कामरा ठाकरे गटाच्या सांगण्यावरून हे करत असावा.”

सविस्तर वृत्त वाचा

10:53 (IST) 24 Mar 2025

स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराविरोधातही गुन्हा दाखल

मुंबई : स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराने एकनाथ शिंदे आणि शिवसेनेवर विडंबनात्मक गाणे सादर केल्याने वाद निर्माण झाला आहे. त्याबाबत कुणाल कामराविरोधात गुन्हाही दाखल झालेला आहे.शिवसैनिकांनी खार भागात असलेल्या युनिकॉन्टिनेंटल स्टुडिओची तोडफोड केली. याप्रकरणी शिवसेनेकडून(शिंदे गट) एमआयडीसी पोलिसांकडे कुणाल कामराविरोधात तक्रार करण्यात आली होती. त्यानुसार याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर वृत्त वाचा

10:26 (IST) 24 Mar 2025

Kunal Kamra Eknath Shinde Controversy Live

मंत्री प्रताप सरनाईक खार पोलीस ठाण्यात दाखल

10:24 (IST) 24 Mar 2025

Kunal Kamra Controversy: कुणाल कामरा गाण्यामुळे अडचणीत, शिवसैनिक आक्रमक

https://www.youtube.com/watch?v=kOdg6NTPz5I

10:20 (IST) 24 Mar 2025

"देवेंद्र फडणवीसांना गृहखात्याचा कारभार झेपत नाहीय", संजय राऊतांची टीका

कुणाल कामरा हा एक लेखक आणि विनोदी कलाकार आहे. तो स्वतःचे शो करत असतो. राजकीय व्यंगात्मक टीका टीप्पणी करत असतो. त्याने आमच्यावरही टीका केलेली आहे. कालच्या पॉडकास्टमध्ये तो ठाणे की रिक्षा असं काहीतरी म्हणतोय. यामध्ये कोणाला अस्वस्थ होऊन त्याचा स्टुडिओ फोडण्याची काय गरज आहे. ५०-६० लोक जातात, हातात लाठ्याकाठ्या घेतात आणि स्टुडिओ उद्ध्वस्त करतात. या महाराष्ट्राला कमजोर गृहमंत्री लाभल्याचं हे लक्षण आहे. देवेंद्र फडणवीसांनी गृहखातं सोडावं, कारण त्यांना ते झेपत नाही. गृहखात्याचा कारभार त्यांना झेपत नाही, किंवा त्यांना काम करू दिलं जात नाहीय. बीड, नागपूरला काय झालं? आज राज्याच्या राजधानी एका पॉडकास्टरचा स्टुडिओ उद्ध्वस्त केला. पोलीस काय झोपा काढत होते? - संजय राऊत</p>

08:33 (IST) 24 Mar 2025

"कामरा आणि त्याच्या आकाला भांगडा करायला लागणार", शीतल म्हात्रेंचा इशारा

छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारा हा तोच भामटा कुणाल कामरा... बिनकामाचे धंदे करणाऱ्या कामराने एकनाथ शिंदे साहेबांची माफी मागावी, नाहीतर हा असंगाशी संग करणाऱ्या कामराला आणि त्याच्या “आका”ला शिवसैनिकांमुळे भांगडा करायला लागणार हे नक्की - शीतल म्हात्रे, प्रवक्त्या, शिवसेना</p>

https://twitter.com/sheetalmhatre1/status/1903871467743486087

08:28 (IST) 24 Mar 2025

कामरा तुम्हाला महाराष्ट्रात फिरू देणार नाही, शिंदे गटाचा कुणाल कामराला इशारा

ठाणे – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर कुणाल कामरा याने आक्षेपार्ह गाणे आणि विधान केल्याप्रकरणी आता पडसद उमटू लागले आहेत. कामरा याच्या विरोधात शिंदे गटाचे शिवसैनिक आक्रमक होत असून नरेश म्हस्के यांनी तर कुणाल कामरा याला महाराष्ट्रात फिरू देणार नाही असा इशारा दिला आहे. त्यामुळे हे प्रकरण आता चिघळण्याची शक्यता आहे.

सविस्तर वृत्त वाचा

08:27 (IST) 24 Mar 2025

Kunal Kamra : खुर्च्या फेकल्या, लाईट्स तोडल्या; कुणाल कामराविरोधात शिवेसना आक्रमक, क्लबची केली तोडफोड!

Kunal Kamra’s Show : प्रसिद्ध स्टॅण्डअप कॉमेडिअन कुणाल कामराने एक विडंबनात्मक गाणं बनवून एकनाथ शिंदे यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली होती. यावरून आता शिंदेंच्या शिवसेनेचे नेते आणि कार्यकर्ते आक्रमक झाले असून शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी ज्या ठिकाणी कार्यक्रम झाला त्या हॉटेलची तोडफोड केली आहे.

सविस्तर वृत्त वाचा

08:27 (IST) 24 Mar 2025

Kunal Kamra : कुणाल कामराने उडवली एकनाथ शिंदेंची खिल्ली, “मेरी नजरसे तुम देखो तो गद्दार..”; संजय राऊत म्हणतात…

Kunal Kamra : स्टँड अप कॉमेडियन कुणाल कामराने एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओत तो उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर विडंबन करणारं गाणं म्हणताना दिसतो आहे. या गाण्यात त्याने एकनाथ शिंदेंचा उल्लेख गद्दार असा केला आहे. हा व्हिडिओ संजय राऊत यांनी पोस्ट केला आहे. यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटण्याची चिन्हं आहेत.

सविस्तर वृत्त वाचा

08:26 (IST) 24 Mar 2025

Kunal Kamra Live Updates : "हा फक्त ट्रेलर", युवानेते राहुल कनाल यांची पहिली प्रतिक्रिया; कुणाल कामराला थेट इशारा

हा फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी आहे. कोणीही आमच्या वरिष्ठ नेत्यांवर टीका करत असेल तर त्याच्या घरी जाणार. कारण आमच्या घरातील वरिष्ठांना जर कोणी बोलणार असेल तर आम्ही त्यांच्या घरीही जाणार. घरातील ज्येष्ठ व्यक्तींचा अपमान करणं अभिव्यक्ती स्वातंत्र्य नसतं. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा योग्यप्रकारे वापरलं गेलं पाहिजे - राहुल कनाल, युवानेते सरचिटणीस

आम्ही मुंबईचे रहिवासी आहोत. मुंबई पोलिसांनी चौकशीसाठी बोलावलं होतं, म्हणून आलो होतो. यापुढेही त्यांना सहकार्य करणार - राहुल कनाल, युवानेते सरचिटणीस