सोलापूर : आघाडीचा विनोदवीर HB प्रणित मोरे याच्यावर सोलापुरात झालेल्या हल्ल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या प्रमुख सूत्रधारासह आणखी पाच जणांना पोलिसांनी अटक केली आहे. तन्वीर शेख आणि कौशल शिंदे अशी अटक झालेल्या प्रमुख सूत्रधारांची नावे आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सोलापुरातील एका हॉटेलमध्ये प्रणित मोरे हा मनोरंजनपर कार्यक्रम सादर करण्यासाठी आला असता त्यास मारहाण झाली होती. बॉलीवूडमध्ये प्रथमच पदार्पण केलेल्या वीर पहारिया याच्यावर विडंबन केल्याचा जाब विचारत १० तरुणांनी प्रणित मोरे यास हॉटेलमध्येच मारहाण केली होती. त्याबाबतचा गुन्हा सदर बाजार पोलीस ठाण्यात दाखल झाल्यानंतर सुरुवातीला संशयित हल्लेखोरांपैकी पाच जणांना अटक करण्यात आली होती. अन्य पाचजण सापडत नव्हते. दरम्यान, यातील सूत्रधार मानले गेलेल्या तन्वीर शेख आणि कौशल शिंदे हे दोघे पोलिसांना गुंगारा देण्यासाठी गोवा, कोकणात फिरत होते. सोलापुरात परत आल्यानंतर त्याची माहिती मिळताच पोलिसांनी त्या दोघांसह उर्वरित पाच जणांना जेरबंद केले. शेख व शिंदे या दोघांनी प्रणित मोरे याच्यावर हल्ला करण्याचा कट रचला. त्याचाच भाग म्हणून प्रणित मोरे यांच्या कार्यक्रमाची तिकिटे खरेदी करून आपल्या साथीदारांना कार्यक्रमस्थळी बोलावून घेतले. नंतर त्याच्यावर हल्ला करण्यात आल्याचे चौकशीत निष्पन्न झाले, असे पोलीस उपायुक्त (परिमंडळ) विजय कबाडे यांनी सांगितले.