केंद्राच्या त्रिसदस्यीय समितीने ‘फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिटय़ूट ऑफ इंडिया’ला (एफटीआयआय) शुक्रवारी दिलेल्या भेटीमुळे संस्थेतील तणावाचे वातावरण एकदम पालटले आहे. या समितीचा अहवाल सोमवारी मंत्रालयाकडे सुपूर्द करणार असल्याची माहिती समितीचे सदस्य एस. एम. खान यांनी दिली. समितीने आपले म्हणणे ऐकून घेण्यात रस दाखवल्यामुळे संपाची कोंडी लवकरच फुटेल, अशी आशा विद्यार्थी व्यक्त करत आहेत.
खान हे ‘ऑफिस ऑफ द रजिस्ट्रार ऑफ न्यूजपेपर्स फॉर इंडिया’चे महासंचालक असून त्यांनी यापूर्वी राष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे संचालक म्हणूनही काम पाहिले आहे. त्यांच्याबरोबर चित्रपट विभागाच्या संचालक अंशू सिन्हा आणि अंतर्गत सचिव एस. नागनाथन यांचाही समितीत समावेश होता. खान म्हणाले, ‘एफटीआयआयप्रश्नी तर्कशुद्ध तोडगा निघू शकेल याविषयी आम्ही आशावादी आहोत. आम्ही विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी सर्वाशी बोललो. विद्यार्थ्यांचे आमच्याशी वर्तन चांगले होते. संस्थेच्या प्रांगणात संचालकांसाठी अतिरिक्त सुरक्षा व्यवस्थेची आवश्यकता नसल्याचे माझे मत असून त्याविषयीही संचालकांशी चर्चा झाली.’ संपूर्ण चर्चेचा तपशील जाहीर करण्यास तसेच विद्यार्थ्यांवर पोलिसांनी केलेल्या कारवाईबद्दल बोलण्यास मात्र खान यांनी नकार दिला. समितीबरोबरच्या चर्चेत ८ विद्यार्थी प्रतिनिधी सहभागी होते.
विद्यार्थ्यांची मूळ मागणी आणि संपकाळात मध्येच उपटलेल्या मूल्यमापनासारख्या इतर गोष्टींची एकत्र गल्लत करणे बरोबर नाही, असे मत माजी विद्यार्थिनी सुरभि शर्मा यांनी व्यक्त केले.
‘एफटीआयआय’ची कोंडी फुटणार?
केंद्राच्या त्रिसदस्यीय समितीने ‘फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिटय़ूट ऑफ इंडिया’ला (एफटीआयआय) शुक्रवारी दिलेल्या भेटीमुळे संस्थेतील तणावाचे वातावरण एकदम पालटले आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 22-08-2015 at 03:38 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Committee meets to ftii students