प्रदीप नणंदकर

लातूर : सोयाबीनचा पेरा आणि उत्पादन वाढल्याने बियाणे कंपन्यांचे मराठवाडय़ात लक्ष केंद्रित झाले आहे. विविध कंपन्यांचे प्रतिनिधी बाजारपेठेमध्ये सोयाबीन खरेदीकडे डोळे लावून बसले आहेत थोडासा बरा दिसणारा माल बियाणासाठी वापरला जातो व त्यावर वेगवेगळय़ा वाणांचे लेबल लावले जाते व असे बियाणे बाजारपेठेत पुढील हंगामासाठी विकले जाते .काही कंपन्या महाराष्ट्रातील माल मध्य प्रदेशात विकतात, काही मराठवाडय़ातील माल विदर्भात, तर विदर्भातील माल मराठवाडय़ात या पद्धतीने विक्री केली जाते. एकूणच सोयाबीनच्या खरेदीसाठी कंपन्यांचा सुळसुळाट झाला आहे.

zomato swiggy now sell their food products directly to consumer
झोमॅटो, स्विगीकडून आता त्यांच्या खाद्य उत्पादनांची थेट विक्री; हॉटेल व्यावसायिकांचा विरोध, कारवाईची सरकारकडे मागणी 
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Redesign of Pune-Nashik railway line
‘जीएमआरटी’चे स्थलांतर नाही… पुणे-नाशिक रेल्वेमार्गाची नव्याने आखणी
Soyabean Purchase Objective Failed farmers in trouble
सोयाबीन खरेदीचा खेळखंडोबा; जाणून घ्या, खरेदीचे उद्दिष्ट का फसले, शेतकऱ्यांचे किती कोटी थकले ?
cotton price farmers are still facing problems
कापूस उत्‍पादकांची परवड ‘सीसीआय’नेही घटवले दर…
Mumbai first box of saffron mangoes of this season will be sold today
आंब्याची पहिली पेटी वाशी बाजारात जाणून घ्या, हंगामातील आवक कशी राहणार
tomato cauliflower cabbage ginger peas prices fall down
आले, टोमॅटो, मटार, फ्लॉवर, कोबीच्या दरात घट
soybean , soybean registration, soybean guaranteed rate,
सोयाबीन नोंदणीस मुदतवाढ, तरीही दर हमीभावापेक्षा कमी

 गेल्या काही वर्षांत सोयाबीनचे क्षेत्र महाराष्ट्रात झपाटय़ाने वाढत असून देशातील सर्वाधिक लागवडीखालील क्षेत्र  असणारे राज्य म्हणून महाराष्ट्राची ओळख आहे. सोयाबीनचा पेरा ४२ लाख हेक्टर्सपेक्षादेखील महाराष्ट्रात अधिक असतो. सोयाबीनचे उत्पादन वाढावे यासाठी कृषी विद्यापीठांच्या वतीने नवीन बियाणे संशोधित केले जातात, त्याचे प्रयोग केले जातात व ते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतील यासाठी प्रयत्न केले जातात. शासकीय कंपन्यांमार्फत प्रमाणित बियाणे विक्री केले जातात, मात्र अशा बियाणांचा पुरवठा पुरेसा होत नाही. त्यामुळे खासगी कंपन्या गेल्या काही वर्षांत मोठय़ा प्रमाणात बाजारपेठेत उतरलेल्या आहेत. त्यांचे विक्री तंत्र अतिशय आक्रमक असते. विश्वासार्हतेने काम करणाऱ्या कंपन्यांचे प्रमाण कमी आहे व काही करून आपला माल विकणे यावर भर देणाऱ्या अनेक कंपन्या बाजारपेठेत उतरलेल्या आहेत. सध्या सोयाबीन काढणीचा हंगाम सुरू झाला असून बाजारपेठेत नवीन सोयाबीन दाखल होत आहे .बियाणांचे प्रमाणित बियाणे व दुसरे सत्यतायुक्त (ट्रुथफूल) असते. प्रमाणित बियाणांचे प्रमाण कमी असल्याने व त्यात बाजारपेठेची गरज भागत नसल्याने सत्यतायुक्त बियाणांची विक्री मोठय़ा प्रमाणावर होते. कंपन्यांची कोणतीच जबाबदारी असत नाही. त्यातून शेतकऱ्याची मोठी फसवणूक होते .

पेरलेले उगवले नाही, उगवले तर त्याची नीट वाढ झाली नाही व वाढ झाली तरी पुरेशा शेंगा लागल्या नाहीत, अशा तक्रारी शेतकऱ्यांच्या येत आहेत. गेल्या तीन-चार वर्षांत सोयाबीनचे फुले संगम हे वाण बाजारपेठेत चांगले चालले आहे. हे वाण १२० दिवसांचे असून याचा उतारा चांगला आहे. काढणीच्या वेळी दरवर्षी पाऊस येतो. हे वाण पेरले तर थोडा उशीर लागत असल्यामुळे काढणीच्या वेळी पावसात सापडत नाही. त्यामुळे या वाणाच्या पेरणीचे क्षेत्र वाढते आहे. बाजारपेठेत एखाद्या शेतकऱ्याने माझे सोयाबीन फुले संगमचे आहे असे सांगितले तर त्याच्या मालाला बाजारपेठेतील भावापेक्षा क्विंटलला २०० ते ३०० रुपये वाढवून दिले जातात .तो माल खराच फुले संगम वाणाचा आहे का, हे कोणीही पाहत नाही. इथपासूनच फसवणूक करण्यामध्ये सर्व प्रकारच्या लोकांचा समावेश आहे. आपल्याला अधिकचे पैसे मिळाले पाहिजेत, ही भूमिका प्रत्येकाची असते. त्यात शासकीय यंत्रणेचा हस्तक्षेप कुठेच नसतो, त्यामुळे सगळे काही राजरोस चालते.

लातूर बाजारपेठेत बियाण्याच्या नावाखाली खासगी कंपन्यांचा सध्या सुळसुळाट वाढला आहे. इकडे खरेदी केलेला माल मोठय़ा प्रमाणात पॅकिंग करून बियाणांचे लेबल लावून तो विकला जातो. काढणीच्या वेळी पाऊस झालेला असल्याने व घरचे बियाणे चांगल्या प्रतीचे नाही या कारणामुळे शेतकरी पुढील वर्षी नवीन बियाणे घेणे पसंत करतो. मात्र ते बियाणे चांगल्या प्रतीचे आहे की नाही याची खात्रीच कोणी देत नाही.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणीचे माजी कुलगुरू डॉक्टर अशोक धवन यांना यासंबंधी विचारले असता ते म्हणाले, बियाणे उत्पादनाचे क्षेत्र वाढले पाहिजे, त्यासाठी विद्यापीठांना द्यावा लागणारा जो निधी आहे तो गेल्या दहा वर्षांत पुरेसा मिळालेला नाही, त्यामुळे आवश्यक तेवढे बियाणे उत्पादित केले जात नाही. अगदी महाबीज कंपनीसाठीदेखील लागणारा योग्य निधी उपलब्ध केला जात नाही, त्यामुळेच अडचणी येत आहेत, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. सेवानिवृत्त कृषी अधिकारी अनंत गायकवाड यांना बियाणांच्या फसवणुकीसंबंधी विचारले असता ते म्हणाले, शेतकऱ्यांनी प्राधान्यक्रम प्रमाणित बियाणांसाठीच द्यावा. त्यानंतर ज्या कंपन्यांच्या बियाण्याचा आपण पूर्वी शेतात पेरा केला आहे अशाच कंपन्यांचे बी खरेदी करावे. बाजारात मिळत नाही या कारणामुळे जे दुकानदाराकडे उपलब्ध आहे असे बियाणे घेऊन पेरण्याचे धाडस करू नये.

Story img Loader