अयोध्येतील राम मंदिरात श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांनी देशाला संबोधित केले. या भाषणात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी केली. यावरून आता देशभरात वादंग निर्माण झालं आहे. राजकीय क्षेत्रातून प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. तसंच, छत्रपती संभाजी महाराज यांनीही यावरून प्रतिक्रिया दिली आहे.

गोविंददेव गिरी महाराज काय म्हणाले होते?

“तप करणे ही भारताची परंपरा राहिली आहे. आज या ठिकाणी मला एका राजाची आठण होत आहे, ज्यात हे सर्व गुण होते, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज”, असे गोविंददेव गिरी यांनी सांगितले. “आज मला स्वामी समर्थ महाराज यांचीही आठवण होत आहे. त्यांनी शिवाजी महाराजांचे वर्णन करताना म्हटले, “निश्चयाचा महामेरू। बहुत जनांसी आधारू । अखंड स्थितीचा निर्धारू। श्रीमंत योगी”. आज आपल्याला असाच एक श्रीमंत योगी प्राप्त झाला आहे”, अशी भावना गोविंदगिरी महाराजांनी यावेळी व्यक्त केली होती.

after Devendra Fadnavis elected as cm Nagpur is waiting for Devendra fadnavis Arrival at Ramgiri
‘रामगिरी’ला ‘देवा’भाऊची प्रतीक्षा; आता लवकर या…
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
difference between shivlinga jyotirlinga
शिवलिंग आणि ज्योतिर्लिंग यांच्यात नेमका फरक काय?
shivsena ubt adv harshal Pradhan
महाराष्ट्र पुढे जाणार तरी कसा?
News About Marathi Drama Urmilyan
‘उर्मिलायन’ महाकाव्यातून उलगडणार रामायणातील लक्ष्मणच्या पत्नीचं कथाख्यान, ‘या’ दिवशी होणार शुभारंभाचा प्रयोग
Sadabhau Khot
“राहुल गांधींचं एकच स्वप्न, मेरी शादी कब होगी?” मारकडवाडीतून सदाभाऊ खोतांचा चिमटा; ‘खळं लुटणारा’ म्हणत पवारांवर टीका
Shashank Arora
“आम्ही वाळवंटात भारत-पाकिस्तानच्या बॉर्डरजवळ…”, इरफान खान यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभव सांगत अभिनेता म्हणाला, “मला पतंग…”
Sunny Deol Confirms His Role in Ramayana
नितेश तिवारी यांच्या ‘रामायण’ चित्रपटात काम करण्याबाबत सनी देओलकडून भूमिका स्पष्ट; म्हणाला, “हा चित्रपट ‘अवतार’प्रमाणे…”

हेही वाचा >> पंतप्रधान मोदींची छत्रपती शिवाजी महाराजांशी तुलना; गोविंदगिरी महाराज म्हणाले, “श्रीमंत योगी…”

छत्रपती संभाजी महाराज काय म्हणाले?

गोविंदगिरी महाराज काय म्हणाले आहेत, हे मला माहिती नाही. परंतु, शिवाजी महाराजांची तुलना कोणीच करू शकत नाही. आपण त्यांचा आदर्श आणि विचार घेऊन चालायचं आहे. शिवाजी महाराज जगात आदर्श आहेत. शिवाजी महाराजांशी तुलना होऊ शकेल असा कोणीही या जगात अद्याप जन्माला आलेला नाही. त्यामुळे शिवाजी महाराजांच्या विचारांतून त्यांचा आदर्श घ्यायचा आहे, असं छत्रपती संभाजी महाराज म्हणाले.

गोविंददेव गिरी अजून काय म्हणाले?

“पंतप्रधान मोदी यांनी केवळ तीन दिवसांचा उपवास करण्यास सांगितले होते. पण त्यांनी ११ दिवसांचा उपवास केला. एखाद्या राष्ट्रीय नेत्यांनी एवढा त्याग करणे सोपी गोष्ट नाही. तसेच दिव्य देशांचा प्रवास करावा असेही आम्ही सांगितले. मोदींनी नाशिकच्या पंचवटीपासून प्रवास सुरू केला ते कन्याकुमारीच्या रामेश्वरपर्यंत ते गेले. आम्ही तीन दिवस भूमिशयन करायला सांगतिले होते. पण या कडाक्याच्या थंडीत पंतप्रधान मोदी ११ दिवस भूमिशयन करत आहेत”, असेही स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांनी सांगितले.

Story img Loader