पाचवे स्पर्धा परीक्षा साहित्य संमेलन शुक्रवारपासून कोल्हापूरमध्ये सुरू होते आहे. संमेलनाच्या अध्यक्षस्थानी डॉ. विजयकुमार फड असून, स्वागताध्यक्ष राज्याचे गृह राज्यमंत्री सतेज ऊर्फ बंटी पाटील असणार आहेत.
शुक्रवारी संध्याकाळी चार वाजल्यापासून ग्रंथ दिडींनी संमेलनाला सुरुवात होते आहे. शनिवार आणि रविवारी दोन दिवस संमेलनातील कार्यक्रम होणार आहेत. उदघाटनानंतरच्या सत्रामध्ये राज्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील झेडपी सदस्य ते उपमुख्यमंत्री या विषयावर अनुभव कथन करणार आहेत. त्याच दिवशी स्पर्धा परीक्षा आणि राज्यातील विद्यार्थ्यांचा दर्जा या विषयावरही चर्चासत्र होणार आहे.
संमेलनाच्या अखेरच्यादिवशी प्रसारमाध्यमे आणि युवक या विषयावर चर्चासत्र होणार असून, त्यामध्ये ज्येष्ठ पत्रकार निळू दामले, माहिती संचालक प्रल्हाद जाधव सहभागी होणार आहेत. त्यानंतर स्पर्धा परीक्षा अभ्यास चळवळ या विषयावर परिसंवाद होणार आहे. डॉ. आनंद पाटील हे या संमेलनाचे निमंत्रक आहेत.

Story img Loader