पोलीस वसाहतीचे काम तातडीने पूर्ण करावे अशा सूचना केंद्रीय पर्यावरण व वनमंत्री ना.प्रकाश जावडेकर यांनी संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांना दिल्या.  केंद्रीय पर्यावरण व वनमंत्री ना. प्रकाश जावडेकर सध्या महाबळेश्वर दौऱ्यावर असून शनिवारी सकाळी  त्यांनी राजभवन येथे विविध प्रश्नांबाबत संबंधित सर्व खात्याच्या अधिकाऱ्यांची बठक घेवून महाबळेश्वर व परिसरातील प्रश्नांबाबत माहिती जाणून घेतली तसेच परिसरातील भाजप  पदाधिकाऱ्यांकडून  येथील प्रश्नांबाबतच्या अडीअडचणीही समजावून घेतल्या. विविध प्रश्नांवर चर्चा सुरु असतानाच भाजप सातारा जिल्हा कार्यकारिणी पदाधिकारी व महाबळेश्वरचे माजी नगरसेवक ,उद्योजक रवींद्र कुंभारदरे यांनी महाबळेश्वर पोलीस वसाहतीच्या दुर्दशेबाबत शासनाचा नवीन बांधकामासाठी निधी येऊनही त्याची दुरवस्था कायम असल्याचे  सांगितले. नंतर खात्याचे अभियंता व्ही .ए.पाटसकर  व महाबळेश्वरचे पोलिस निरीक्षक प्रकाश सावंत यांना त्यांनी बोलावून घेतले व या कामाबाबत माहिती करून घेतली. तसेच शासनाकडून या कामासाठी निधी मंजूर झालेला असताना व तो खात्याकडे दोन वर्षांपूर्वीच वर्ग झाला असताना  हे काम का सुरु झाले नाही, असा जाब विचारला. याचवेळी महाबळेश्वरचे  माजी नगराध्यक्ष विद्यमान नगरसेवक  डी.एम. बावळेकर यांनी आपल्याच हस्ते या व अन्य कामांचा नारळ पावसाळ्यानंतर फोडावा व शुभारंभ करावा असे सूचित करून त्यामुळे येथील कामास  अधिक गती येईल असे सुचविले. त्यास मंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला .या वेळी पोलीस निरीक्षक प्रकाश सावंत ,भाजपचे पदाधिकारी ओंकार दीक्षित ,चिन्मय आगरकर , सनी उगले ,वनखात्याचे अधिकारी महादेव मोहिते ,पालिका मुख्याधिकारी सचिन पवार ,आवेक्षक एम एम . काटेकर आदी उपस्थित होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा