कॉम्रेड गोविंद पानसरे यांचे हल्लेखोर कर्नाटकमधील असावेत किंवा तेथे पळून गेले असावेत, असा सुगावा या हत्येचा तपास करणाऱ्या विशेष तपास पथकाला (एसआयटी) लागला आहे. गृह विभागाच्या उच्चपदस्थ सूत्रांनी ही माहिती दिली. हल्लेखोरांना पाहिलेल्या साक्षीदारांकडून मिळालेल्या वर्णनावरून हल्लेखोरांची रेखाचित्रे तयार करण्यात आली आहेत.  रेखाचित्रे आणि अन्य पुराव्यांवरून हे हल्लेखोर कर्नाटकमधील असल्याचा संशय एसआयटीच्या अधिकाऱ्यांना वाटत आहे.

Story img Loader