पाच दिवसांपासून सुरू असलेल्या १०८व्या भारतीय विज्ञान काँग्रेसचा शनिवारी थाटात समारोप झाला. एक लाखांहून अधिक विज्ञानप्रेमींच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे नागपूरने यजमानपद भूषविलेली १०८ वी भारतीय विज्ञान काँग्रेस संस्मरणीय ठरली.
हेही वाचा- ‘इंडियन सायन्स काँग्रेस’मुळे महिला संशोधकांना बळ मिळेल
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात ३ ते ७ जानेवारी या कालावधीत आयोजित विज्ञान काँग्रेसमध्ये परिसंवाद, चर्चासत्र, नोबेल पारितोषिक विजेत्या वैज्ञानिक प्रा. ॲडा योनाथ यांच्या व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी २७ परिसंवाद पार पडले. बाल, महिला, शेतकरी व आदिवासी विज्ञान काँग्रेसचे आयोजनही संस्मरणीय ठरले. यंदा प्रथमच आदिवासी विज्ञान काँग्रेसचे आयोजन करण्यात आले होते. समारोपाला कानपूरवरून नागपूर येथे दाखल झालेल्या विज्ञान ज्योतीला विज्ञान काँग्रेसच्या अध्यक्ष डॉ. विजयलक्ष्मी सक्सेना यांनी डॉ. अरविंद सक्सेना यांच्याकडे सोपवून अधिकृत समारोप केला.
हेही वाचा- बंजारा समाजाला सनातन धर्माशी जोडण्याचे भाजप, संघाचे षडयंत्र; देवानंद पवार यांचा गंभीर आरोप
विज्ञानप्रेमींसाठी पर्वणी
विज्ञानप्रेमींसाठी पर्वणी ठरलेल्या या परिषदेत एकूण २७ परिसंवादांचे आयोजन करण्यात आले होते. सर्वच विषयांवर सखोल चर्चा झाली. अनेक दिग्गजांचा यात सहभाग होता. भारताची २०३० मधील वाटचाल, अंतराळ विज्ञान आणि तंत्रज्ञान, कोविड आजारानंतर दिसून येणारे परिणाम, कर्करोग, पुरुष प्रजनन संदर्भातील संशोधन यासह विविध विषयांवर परिसंवादांचे आयोजन करण्यात आले होते. देश -विदेशातील अनेक संशोधक, वैज्ञानिक या परिषदेत सहभागी झाले होते.
हेही वाचा- विदर्भाला लोहयुग, मौर्यपूर्व व मौर्य वाकाटक कालखंडाचा वारसा
बाल विज्ञान प्रदर्शनाला प्रतिसाद
बाल विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन ‘निरी’चे माजी संचालक डॉ.सतीश वाटे यांच्या हस्ते करण्यात आले. १० ते १७ वर्षे वयोगटातील बालवैज्ञानिकांचे विविध प्रयोग येथे प्रदर्शित करण्यात आले. देशभरातील बालकांनी या प्रदर्शनाला हजेरी लावली.