जालना : मराठा समाजाला सरसकट ‘कुणबी’ दाखले देण्याच्या मागणीसाठी दोन आठवडय़ांपासून आंतरवाली सराटी येथे उपोषणास बसलेले मनोज जरांगे यांनी आंदोलन मागे घेण्याची तयारी दर्शवली आहे. मात्र, समितीचा अहवाल काहीही आला तरी महिन्याभराने मराठा समाजाला ‘कुणबी’ दाखले देण्याच्या मागणीसह पाच अटी जरांगे यांनी सरकारसमोर ठेवल्या आहेत. मराठा आरक्षणाबाबत सोमवारी रात्री मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत सर्वपक्षीय बैठक झाली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
बैठकीतील चर्चा आणि निर्णयांबाबत माहिती देण्यासाठी मंत्री संदीपान भूमरे आणि माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी मंगळवारी सकाळी उपोषणस्थळी जरांगे यांची भेट घेतली. त्यावेळी आपण दुपारी दोन वाजता मराठा समाजबांधवांशी विचारविनिमय करणार असल्याचे जरांगे यांनी त्यांना सांगितले होते. याच वेळी संभाजी भिडे यांनीही जरांगे यांची भेट घेऊन मराठा आरक्षणास पाठिंबा दिला. अखेर काही अटींवर उपोषण सोडण्याची तयारी जरांगे यांनी दर्शवली. ‘‘आरक्षणाची प्रक्रिया सुरू झाली असून, त्यासाठी सरकारला एक महिना द्यावा, असे आपल्या तज्ज्ञांचे म्हणणे आहे. आपल्या मागण्या पूर्ण होईपर्यंत गावागावांत आणि येथेही साखळी उपोषण सुरू ठेवा.
हेही वाचा >>> धनगर आरक्षणप्रश्न संसदेत मांडू – सुप्रिया सुळे
आरक्षणाची मागणी पूर्ण झाल्यावर देशात झाली नसेल इतकी भव्य सभा घेऊ’’, असे जरांगे म्हणाले. ‘‘सर्व राजकीय पक्षांनी एकत्रित बैठक घेऊन मराठा समाजाच्या बाजूने उभे राहण्याचा ठराव केला आहे. गेली ७५ वर्षे मराठा समाजाने राजकीय मंडळींना भरभरून दिले आहे. निर्णयाच्या प्रक्रियेत मराठा आरक्षण येत नव्हते. ते प्रक्रियेत आणण्याचे काम आपण केले आहे’’, असे जरांगे म्हणाले. उपोषणाबाबत काय निर्णय घ्यायचा, याबाबत जरांगे यांनी उपस्थितांना त्यांचे मत विचारले. आपण तुमच्यासमोर बोललो असलो तरी अंतिम निर्णय तुम्हालाच घ्यायचा आहे, असे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले. उपस्थित समाजबांधवांनी हात उंचावून जरांगे यांना पाठिंबा दिला.
हेही वाचा >>> महिनाभरात इंडिया आघाडीत जागांचे वाटप; शरद पवार – उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा
बीड येथे पुढाऱ्यांच्या घरासमोर घोषणाबाजी
बीडसह मराठवाडय़ातील गावागावांत साखळी उपोषण सुरू आहे. ठिकठिकाणच्या ग्रामपंचायतींनी मतदानावर बहिष्कार घालण्याचा ठराव केला आहे. मनोज जरांगे यांच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून अनेकांनी अन्नत्याग सुरू केला आहे. मंगळवारी मराठा आंदोलकांनी आमदार आणि पुढाऱ्यांच्या दारात जाऊन घोषणाबाजी केली. दरम्यान, सकाळी उपोषणात सहभागी झालेल्या दाम्पत्याने दुपारी आत्महत्या केल्याचीही घटना बीड जिल्ह्यात घडल्याने त्यांच्या आत्महत्येचे कारण आरक्षण मागणीशी संबंधित असल्याचा दावा केला जात आहे.
यवतमाळमध्ये तरुणाचे विषप्राशन
यवतमाळ : उमरखेड येथे गेल्या सात दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या उपोषणादरम्यान आरक्षणाची मागणी करत एका तरुणाने विषप्राशन केल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली. अशोक देवराव जाधव (३५) असे या तरुणाचे नाव असून, त्याच्यावर यवतमाळ येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत.
अटी काय?
- समितीचा अहवाल काहीही आला तरी एका महिन्याने महाराष्ट्रातील मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्रे द्या.
- उपोषण सोडताना मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी, उदयनराजे आणि संभाजीराजे यांच्याबरोबर यावे.
- सरकारने आरक्षणाबाबत लेखी आश्वासन द्यावे.
- महाराष्ट्रातील आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्यावेत.
- दोषी पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करावे.
दोन पोलीस अधिकारी निलंबित
मुंबई : जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी गावातील मराठा आंदोलकांवर अमानुष लाठीमाराबद्दल जबाबदार ठरवून राज्य शासनाने अतिरिक्त पोलीस अधीक्षक राहुल खाडे आणि अंबड विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी मुकुंड आघाव यांना मंगळवारी निलंबित केले. या अधिकाऱ्यांनी पदाचा वापर करून गैरकृत्य केल्याचा आणि लोकसेवकाला अशोभनीय वर्तन केल्याचा ठपका गृहविभागाने त्यांच्यावर ठेवला आहे. मराठा आंदोलकांवर १ सप्टेंबर रोजी पोलिसांकडून लाठीमार करण्यात आला. राज्यात त्याचे तीव्र पडसाद उमटले होते.