आगामी विधानसभा स्वबळावर की आघाडीच्या माध्यमातून लढवायच्या याची जोरदार चर्चा सुरू असतानाच सांगलीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांच्या बनावट पत्राने गदारोळ माजविला आहे. जिल्हाध्यक्ष विलासराव िशदे यांच्या सहीने काढण्यात आलेले पत्र बनावट असल्याचे स्पष्ट झाले असून या बनावटगिरीमागील राजकारण कोणाचे याचा शोध घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
सांगलीत काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा आणि विविध संस्थावर कार्यरत असणाऱ्या कार्यकर्त्यांचा निर्धार मेळावा झाला. या निर्धार मेळाव्यात एकीकडे आघाडी शासनाच्या कार्यकर्तृत्वाची नव्याने ओळख कार्यकर्त्यांना देण्यात आली. मात्र मित्र पक्षातील कार्यकर्त्यांकडे असणाऱ्या सहकारी संस्थांची अधोगती अधोरेखीत करीत टीका करण्याचा आनंद नेत्यांनी मिळवत कार्यकत्रे पक्षापासून बाजूला जाणार नाहीत याची दक्षता घेण्यात आली.
या निर्धार मेळाव्याची तयारी करीत असताना बनावट पत्र उघडकीस आले असून एका तालुक्यातील विधानसभा अध्यक्षांनीच पत्राची बनावटगिरी जिल्हाध्यक्ष शिंदे यांच्या नजरेस आणून दिली. विधानसभा निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांची बठक घेऊन तत्काळ निर्णय घेण्याचे आदेश या पत्रात असून त्यासाठी पक्षाचे निरीक्षक आणि जिल्हाध्यक्ष जातीने उपस्थित राहणार असल्याचे पत्रात म्हटले होते.
या पत्राबाबत पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाध्यक्षांकडे विचारणा केली असता अशी बठक बोलावलीच नसल्याचे सांगण्यात आले. यावेळी पक्षाचे निरीक्षक अशोक स्वामी हे सुध्दा हजर होते. यावर िशदे यांची स्वाक्षरी आहे असे सांगितल्यावर खातरजमा करण्यात आली असता सही खरी असली तरी संगणकावर हा पराक्रम करण्यात आल्याचे स्पष्ट झाले. याची तत्काळ गांभीर्याने दखल घेण्यात आली असून चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र पक्षाच्या जिल्हाध्यक्षांच्या सहीच्या बनावटगिरीचे प्रकरण प्रसिध्दी माध्यमांपासून लपविण्याचा आटोकाट प्रयत्न सुरू आहेत.
राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांच्या बनावट पत्राने गदारोळ
आगामी विधानसभा स्वबळावर की आघाडीच्या माध्यमातून लढवायच्या याची जोरदार चर्चा सुरू असतानाच सांगलीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांच्या बनावट पत्राने गदारोळ माजविला आहे.
First published on: 28-08-2014 at 04:00 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Confusion due to bogus letter of ncp district chairman