लोकसभा निवडणुकीसाठी देशात मोदींचे वारे वाहत असताना नांदेडमध्ये मात्र शिवसेना-भाजप युतीच्या कार्यकर्त्यांमधील संभ्रम अजूनही कायम आहे. एकीकडे काँग्रेसचा उमेदवार जाहीर झालेला नाही. भाजपने उमेदवारी जाहीर करूनही तीन आठवडे उलटले तरी प्रचाराची कोणतीही हालचाल दिसून येत नाही. शुक्रवारी युतीच्या कार्यकर्त्यांची बैठक सिडकोत पार पडली खरी, पण निवडणुकीसंदर्भात तेथे कोणतीही रणनीती ठरली नाही.
नांदेड लोकसभा मतदारसंघ युतीच्या जागावाटपात भाजपकडे आहे. राष्ट्रवादीतून भाजपत आलेल्या डी. बी. पाटील यांना उमेदवारी मिळाल्यानंतर भाजपचेच अनेक निष्ठावंत कार्यकत्रे अस्वस्थ झाले होते. पक्षाच्या काही स्थानिक नेत्यांनी भाजप कार्यकर्त्यांची नाराजी दूर केली. भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी प्रचार सुरू करा, कार्यकर्त्यांवर जबाबदारी द्या, अशा भावना बैठकीत मांडल्या. तर दुसरीकडे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मात्र खडे बोल सुनावले. १७ दिवस झाले उमेदवारी जाहीर होऊन, पण अद्याप युतीचा मेळावा नाही. बठका नाहीत, प्रचार कसा आणि कोण करणार? याची चर्चा नाही. अन्य मित्रपक्षांना विश्वासात घेतले जात नाही. असा सूर आवळला. बठकीनंतर शिवसेनेच्या काही पदाधिकाऱ्यांनी नांदेडमध्ये योग्य सन्मान होणार नसेल आणि भाजपच्याच नेत्यांची तनमनधनाने निवडणूक लढविण्याची इच्छा नसेल तर िहगोलीत जाऊन प्रचार करण्याचे स्पष्ट केले.
या बठकीला सुधाकर भोईर, राम पाटील रातोळीकर, डॉ. अजित गोपछडे, प्रवीण साले, बाबुराव केंद्रे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रकाश कौडगे, हेमंत पाटील, दीपक रावत आदी उपस्थित होते. जेव्हा उमेदवारी अर्ज भरण्यात येईल तेव्हाच प्रचाराला सुरुवात करू, असा काही भाजप कार्यकर्त्यांचा होरा आहे.

Story img Loader