नगरः शिवसेनेच्या (ठाकरे गट) उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या नगर जिल्हा न्यायालयाच्या इमारतीमधील बार रूममध्ये आज, शनिवारी दुपारी  आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात मोठाच गोंधळ निर्माण झाला. त्यांच्या या कार्यक्रमात घुसून ठाकरे गटासह मनसेच्या महिला पदाधिकाऱ्यांनी विरोध केल्याने हा गोंधळ निर्माण झाला. सुषमा अंधारे यांना अखेर पोलीस संरक्षणात कार्यक्रम पार पाडावा लागला तसेच कार्यक्रमानंतर त्यांना ठाकरे गटाचे पदाधिकारी व पोलीस संरक्षणात जावे लागले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शिवसेनेच्या (ठाकरे गट) माजी महिला जिल्हाप्रमुख स्मिता अष्टेकर व मनसेच्या महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख वकील अनिता दिघे यांनी सुषमा अंधारे यांच्या कार्यक्रमास विरोध करत, अंधारे यांनी घाणेरड्या भाषेत हिंदू देवतांचा अपमान केल्याने त्यांनी माफी मागावी अन्यथा चपलेने चोप दिला जाईल असे जाहीर करत कार्यक्रमात घूसण्याचा प्रयत्न केला.

हेही वाचा >>>“बाळासाहेब ठाकरेंचा वारसा सांगणाऱ्यांनी आधी आरसा बघावा, कारण..”, एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला

ठाकरे गटाच्या उपनेते सुषमा अंधारे सध्या मातृतीर्थ ते शिवतीर्थ या मुक्तसंवाद यात्रेच्या निमित्ताने नगर जिल्ह्यात आल्या आहेत. आज सकाळी त्यांनी दूध उत्पादक, शेतकरी यांची भेट घेतली तर दुपारी जिल्हा न्यायालयाच्या इमारतीत तळमजल्यावर असलेल्या बार रूममध्ये वकिलांची भेट घेण्यासाठी आल्या होत्या. त्यांच्यासमवेत ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे, शहर प्रमुख संभाजी कदम, माजी महापौर भगवान फुलसौंदर तसेच नगरसेवक व पदाधिकारी होते.

हेही वाचा >>>‘मोदींशी बंद दाराआड चर्चा अण् उद्धव ठाकरेंना घाम फुटला’, एकनाथ शिंदेंनी सांगितला तो प्रसंग

स्मिता अष्टीकर यांनी सुषमा अंधारे यांच्या कार्यक्रमास आपण विरोध करणार असल्याची पूर्वकल्पना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे यांना दिली होती, असे स्पष्ट केले तर मनसेच्या वकील अनिता दिघे यांनी दिलेल्या माहितीनुसार सुषमा अंधारे यांच्या कार्यक्रमासाठी वकील संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची, प्रधान जिल्हा न्यायाधीशांची परवानगी घेण्यात आली नव्हती. पूर्वकल्पना न देता त्या न्यायालयातील बार रूममध्ये आल्या, राजकीय व्यक्तींचे बारमध्ये काय काम? अंधारे यांनी अश्लील भाषेत हिंदू देवतांचा अपमान केला आहे, त्यामुळे त्यांनी माफी मागावी, असे आमचे मागणे आहे, अन्यथा आम्ही त्यांना चोप देऊ, असे जाहीर केले होते.

अष्टेकर व दिघे यांच्या विरोधामुळे कार्यक्रमात मोठा गोंधळ उडाला. पोलिसांनी त्यांना बाररूममध्ये जाण्यापासून अडवले. त्यानंतर पोलीस संरक्षणात कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना सुषमा अंधारे यांनी मनसेच्या काहीजण राजकीय अभिनवेश दाखवत राजकीय स्टंट करत होते, त्या शिळ्या कढीला ऊत आणत आहेत, असा आरोप केला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Confusion in thackeray group deputy leader sushma andhare program in nagar amy
Show comments