आगामी लोकसभा निवडणुकीत आघाडी कायम ठेवण्याचे दोन्ही काँग्रेसने जाहीर केले असले तरी पुढील महिन्यात होणाऱ्या विधान परिषदेच्या औरंगाबाद स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत दोन्ही पक्षांचे किती सूत जुळते यावर पुढील बरीच समीकरणे अवलंबून राहणार आहेत. राष्ट्रवादीने तिरकस चाल खेळू नये, अशी काँग्रेसची अपेक्षा आहे.
औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी १९ ऑगस्टला मतदान होणार आहे. हा मतदारसंघ सध्या शिवसेनेच्या ताब्यात असला तरी कागदोपत्री काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नगरसेवकांची संख्या जास्त आहे. काँग्रेसचे या मतदारसंघात १५० पेक्षा जास्त नगरसेवक असल्याने काँग्रेसने या मतदारसंघावर दावा केला आहे. गुप्त मतदान पद्धतीने निवडणूक असल्याने एखादा आर्थिकदृष्टय़ा बलाढय़ उमेदवार रिंगणात उतरल्यास सारीच गणिते उलटीपालटी होऊ शकतात. किसनचंद तनवाणी हे शिवसेनेचे विद्यमान आमदार असून, सेनेच्या वतीने बलाढय़ उमेदवार रिंगणात उतरविला जाण्याची शक्यता आहे. काँग्रेस व राष्ट्रवादीमध्ये सलोखा राहिल्यास आघाडीचा उमेदवार निवडून येण्यात कोणतीच अडचण येणार नाही.
लोकसभा निवडणुकीसाठी आघाडी कायम ठेवण्याची घोषणा दोन महिन्यांपूर्वीच राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी केली असली तरी काँग्रेसमध्ये राष्ट्रवादीबाबत संशयकल्लोळ कायम आहे. राष्ट्रवादी कोणती भूमिका घेईल याबाबत काँग्रेसच्या नेत्यांमध्ये धाकधूक आहे. या पाश्र्वभूमीवर औरंगाबाद-जालना मतदारसंघात राष्ट्रवादीने उघडपणे विरोधात भूमिका घेतल्यास काँग्रेसला बोलण्यास आपसूकच संधी मिळेल. औरंगाबादमध्ये उमेदवार उभा करण्याची तयारी स्थानिक नेत्यांनी सुरू केली आहे. औरंगाबादमध्ये काँग्रेसच्या नगरसेवकांची संख्या जास्त असल्याने आघाडीत राष्ट्रवादीने मदत केली पाहिजे, अशी भूमिका काँग्रेसचे प्रांताध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी मांडली. या संदर्भात काँग्रेसचे नेते राष्ट्रवादीच्या नेत्यांशी चर्चा करणार आहेत. रविवारी राज्याचे प्रभारी मोहन प्रकाश, प्रदेशाध्यक्ष ठाकरे आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी औरंगाबादमध्ये बैठक घेऊन आढावा घेतला. दरम्यान, आपण १९७८ पासून पक्षाचे निष्ठावान असल्याने उमेदवारी मिळावी अशी मागणी प्रदेश सरचिटणीस प्रकाश मुदगिया यांनी पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे केली आह
काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीची समीकरणे औरंगाबादच्या निवडणुकीवर अवलंबून
आगामी लोकसभा निवडणुकीत आघाडी कायम ठेवण्याचे दोन्ही काँग्रेसने जाहीर केले असले तरी पुढील महिन्यात होणाऱ्या विधान परिषदेच्या औरंगाबाद स्थानिक स्वराज्य
First published on: 22-07-2013 at 04:21 IST
TOPICSविधान परिषद
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cong ncp alliance depend on aurangabad election