वाई:सलगच्या सुट्ट्यांमुळे पुणे सातारा महामार्गावर वाहनांची मोठी गर्दी झाली असून वाहतुकीचा वेग मंदावला आहे. खंबाटकी घाटात वाहतूक अतिशय संथ गतीने सुरू आहे.पर्यटन स्थळे हाउसफुल्ल झाली असून धार्मिक स्थळांवर ही गर्दी होत आहे.मुंबई पुण्याकडून सातारा सांगली कोल्हापूर महाबळेश्वर,पाचगणी,भिलार,कोयनानगर च्या दिशेने येणाऱ्या मार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. वाहनांची होणारी गर्दी पाहता आनेवाडी व खेड शिवापूर टोलनाक्यावर अधिकच्या लेन सुरू करण्यात आल्या आहेत. तसेच मुंबई पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावरही गाड्यांची मोठी गर्दी झाली आहे.

आजपासून सलग तीनदिवस सुट्ट्या आल्याने पर्यटकांनी फिरायला जाण्याचा पर्याय निवडल्याने ही वाहतूक कोंडी झाली आहे. आज शनिवार दुपार नंतर, उद्या रविवार, सोमवारी एक मे महाराष्ट्र दिन अशा चार दिवस लागून सुट्ट्या आल्याने पर्यटकांनी मुंबई पुण्याबाहेर बाहेर जाण्याचा पर्याय निवडला आहे.शाळांना आणि खासगी आणि सरकारी कार्यालये तसेच कंपन्यांना मिळालेल्या सलग सुट्ट्यांमुळे थंड हवेचे पर्यटन स्थळ म्हणून ओळख असणाऱ्या महाबळेश्वर,पाचगणी शहरात पर्यटकांची गर्दी बघायला मिळत आहे.

police action against handcart pullers and auto driver for blocking roads and footpaths in dombivli
डोंबिवलीत रस्ते, पदपथ अडविणाऱ्या हातगाडी, रिक्षा चालकांवर कारवाई, नागरिकांनी व्यक्त केले समाधान
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Special trains for Konkan and Goa on year end and long weekend
कोकण, गोव्यासाठी विशेष रेल्वेगाड्या
land acquisition for ring road
रिंग रोडसाठी २०० हेक्टर भूसंपादन बाकी; ५०० कोटींच्या निधीची रस्ते विकास महामंडळाकडे मागणी
Action against rickshaw drivers violating traffic rules Mumbai news
वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या रिक्षा चालकांवर कारवाई; ४२६ रिक्षा जप्त
Action taken against 20 dumpers for illegally dumping debris navi Mumbai news
नवी मुंबई: राडारोडा टाकणाऱ्या २० डंपरवर कारवाई
problem of potholes on Khopta bridge to Koproli road will cleared soon
खोपटे पूल ते कोप्रोली मार्ग लवकरच खड्डेमुक्त, एक किलोमीटर रस्त्याच्या काँक्रीटीकरणासाठी सात कोटींच्या निधीस मंजुरी
speeding luxury car collide straight into grade
भरधाव अलीशान कार थेट गॅरेजमध्‍ये घुसली; तिघे गंभीर जखमी, अलिबाग चोंढी येथील घटना

शुक्रवार पासूनच पर्यटकांची संख्या वाढू लागली होती. मात्र रविवारी ही संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली दिसून येणार आहे. यामुळे शहरातील अंतर्गत रस्तेही तुडूंब भरल्याने राष्ट्रीय महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे.पुणे- मुंबई व्यतिरिक्त नाशिक, अहमदनगर, बीड व लातूर छत्रपती संभाजी नगर गुजरात येथील पर्यटकांनी साताऱ्यातील पर्यटन स्थळांना पसंती दिली. पर्यटनासोबत स्थानिक खाद्यपदार्थांचा आस्वाद घेणे आवडत आहे. शाळा-महाविद्यालयांना सुट्ट्यांमुळे सर्व बसस्थानक प्रवाशांच्या गर्दीने फुलून गेली आहेत. प्रवाशांची झालेली गर्दी लक्षात घेता एसटी महामंडळांच्या वतीने विभागातून जादा बसेसचे नियाेजन केले आहे.सातारा,महाबळेश्वर पुणे मार्गावर दर अर्ध्यातासाने बसेस सोडली जात असल्याची माहिती विभागीय नियंत्रकांनी दिली.

Story img Loader