पुणे- सातारा महामार्ग ,खंबाटकी घाटात मोठ्या प्रमाणात रस्त्यावर वाहनांची गर्दी झाल्याने वाहतूक कोंडी झाली आहे. या मार्गावर संथ गतीने वाहतूक सुरु आहे. साताऱ्याकडे येणारी वाहतूक खंबाटकी बोगदयातून वळविली आहे.पाचगणी महाबळेश्वर रस्ता व पसरणी घाट वाहनांच्या गर्दीने हाऊस फुल्ल आहे.
हेही वाचा- पुण्याच्या कचरा डेपोतील कचऱ्यातून सौरऊर्जा; दैनंदिन ३०० ते ४०० युनिट निर्मिती
प्रजासत्ताक दिनाची सुट्टी व पुढे एक दिवसानंतर आलेल्या शनिवार रविवारमुळे मोठ्या प्रमाणात चाकरमानी गावाकडे, पर्यटन व देवदर्शनासाठी निघाले आहेत. त्यांची वाहने मोठया संख्येने रस्त्यावर आल्याने पुणे सातारा महामार्गावर वाहनांची मोठी गर्दी झाली आहे. पुणे सातारा महामार्ग वाहनांच्या गर्दीने फुलून गेला आहे. आनेवाडी टोलनाक्यावर वाहनांच्या काही किलोमीटरच्या रांगा लागल्या आहेत. महामार्गाची वाहतूक कोंडी होऊन अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प झाल्याचे दिसून येत आहे. खंबाटकी घाटातून साताऱ्याकडे जाणारी वाहतूक वाढल्याने घाट वाहतूकही ठप्प झाली.या घाट रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली. त्यामुळे साताऱ्याकडे जाणारी वाहतूक खंबाटकी बोगदा मार्गे वळविण्यात आली आहे.
हेही वाचा- ‘कोयत्या गँग विरोधात मोक्का लावण्याची प्रक्रिया सुरू’; चंद्रकांत पाटील यांची माहिती
पाचगणी महाबळेश्वर येथेही पर्यटकांची गर्दी वाढल्यामुळे व त्यांच्या वाहनांमुळे पसरणी घाटात वाहने वाढल्याने घाटात वाहने अडकली आहेत. सर्व मार्गावर पोलीस वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न करत आहेत.या महामार्गावर वाहतूक सुरु आहे मात्र हळू आणि संथ गतीने सुरु आहे.त्यामुळे प्रवाशांना इच्छित स्थळी पोहोचण्यास वेळ लागत आहे.