Congress Candidate 2nd List: विधानसभेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर आता महायुती आणि महाविकास आघाडीतील पक्षांकडून उमेदवारांच्या याद्या जाहीर करण्यात येत आहेत. आज (२६ ऑक्टोबर) काँग्रेसची दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. या दुसऱ्या यादीमध्ये २३ उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. याआधी काँग्रेसने पहिल्या यादीत ४८ उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली होती. त्यानंतर आज दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे.
महाविकास आघाडीतील जागावाटपाबाबत काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्याबरोबर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह राज्यातील काही काँग्रेस नेत्यांची दिल्लीत शुक्रवारी महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत महाविकास आघाडीतील जागावाटपाबाबत सविस्तर चर्चा झाली. यानंतर आज (२६ ऑक्टोबर) काँग्रेसकडून २३ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे.
कोणाला कोणत्या मतदारसंघातून मिळाली संधी?
कांग्रेस अध्यक्ष श्री @kharge की अध्यक्षता में आयोजित 'केंद्रीय चुनाव समिति' की बैठक में महाराष्ट्र विधानसभा चुनाव के लिए कांग्रेस उम्मीदवारों की लिस्ट। pic.twitter.com/77t2qN3KR3
— Congress (@INCIndia) October 26, 2024
कोणत्या २३ उमेदवारांची घोषणा? वाचा यादी!
मतदारसंघाचे नाव | उमेदवार | |
१ | भुसावळ | राजेश मानवतकर |
२ | जळगाव जामोद | स्वाती वाकेकर |
३ | अकोट | महेश गणगणे |
४ | वर्धा | शेखर शेंडे |
५ | सावनेर | अनुजा केदार |
६ | नागपूर दक्षिण | गिरिश पांडव |
७ | कामठी | सुरेश भोयर |
८ | भंडारा | पुजा तवेकर |
९ | अर्जुनी मोरगाव | दिलीप बनसोड |
१० | आमगाव | राजकुमार पुरम |
११ | राळेगाव | वसंत पुरके |
१२ | यवतमाळ | अनिल मांगुलकर |
१३ | अर्णी | जितेंद्र मोघे |
१४ | उमरखेड | साहेबराव कांबळे |
१५ | जालना | कैलास गोरंट्याल |
१६ | औरंगाबाद पूर्व | मधुकर देशमुख |
१७ | वसई | विजय पाटील |
१८ | कांदिवली पूर्व | कालू भडेलिया |
१९ | सायन कोळीवाडा | गणेश कुमार यादव |
२० | श्रीरामपुर | हेमंत ओघले |
२१ | निलंगा | अभय कुमार साळुंके |
२२ | चारकोप | यशवंत सिंह |
२३ | शिरोळ | गणपतराव पाटील |
महाविकास आघाडीचा ९०-९०-९० चा फॉर्म्युला ठरला?
गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीत जागावाटपावरून मतभेद सुरु होते. यासंदर्भात महाविकास आघाडीतील नेत्यांच्या अनेक बैठकाही पार पडल्या. त्यानंतर ८५-८५-८५ जागांचा फॉर्म्युला समोर आला होता. मात्र, त्यानंतर पुन्हा या फॉर्म्युल्यात बदल करण्यात आल्याची माहिती समोर आली. यानंतर आता ९०-९०-९० चा फॉर्म्युला ठरला असल्याची माहिती सांगण्यात आली आहे.