Rahul Gandhi Public Meeting at Shegaon Buldana: काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासंदर्भात केलेल्या विधानानंतर मनसेने शेगावमधील सभा उधळण्याचा इशारा दिला आहे. राहुल गांधींच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्रभरातून मनसैनिक शेगावच्या दिशेने रवाना झाले आहेत. वारंवार सावरकरांचा अपमान करणाऱ्या काँग्रेसला धडा शिकवणार असल्याचं मनसेने म्हटलं आहे. दरम्यान काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी यावर व्यक्त होताना किरकोळ आंदोलन म्हणत खिल्ली उडवली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“काँग्रेसकडून वारंवार स्वातंत्र्यवीर सावकरांचा अपमान करण्याचा प्रयत्न सुरु आहे. त्यांना चाप लावणं गरजेचं आहे. आमच्या अविनाश यांनी अनेक मोठ्या भाईंची भाईगिरी उतरवली आहे, आता पप्पूंची पप्पूगिरी उतरवण्यासाठी जात आहोत,” असा इशारा संदीप देशपांडे यांनी ठाण्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना दिला.

MNS on Rahul Gandhi: राहुल गांधींची शेगावमधील सभा उधळणार, मनसेचा धडा शिकवण्याचा इशारा; म्हणाले “पप्पूंची पप्पूगिरी…”

दरम्यान अशोक चव्हाण यांना मनसेच्या आंदोलनाबाबत विचारण्यात आलं असता ते म्हणाले “लोकांचा इतका पाठिंबा आहे की, अशा किरकोळ आंदोलनाने काही फरक पडत नाही”.

संदीप देशपांडे काय म्हणाले आहेत?

“महाराष्ट्रभरातून मनसैनिक शेगावला पोहोचतील. सावकरांचा अपमान करणाऱ्यांना त्यांना समजेल अशा भाषेत धडा शिकवणार आहोत. पोलिसांनी त्यांचं काम करावं, आम्ही आमचं काम करु,” असंही संदीप देशपांडे म्हणाले आहेत.

Ranjeet Savarkar on Rahul Gandhi: ‘सावरकरांकडून देशाविरुद्ध इंग्रजांना मदत’, राहुल गांधींच्या विधानावर कुटुंब संतापलं, म्हणाले “शिवसेनेचे वारस आज त्याच…”

“काँग्रेसने वल्गना करण्याची गरज नाही. काँग्रेसची काय ताकद आहे हे आम्हाला माहित आहे. ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ हा इतिहास त्यांना माहिती नाही,” असंही ते म्हणाले आहेत. त्यांना धडा शिकवण्याची गरज असून आम्ही तो शिकवणार आहोत असं यावेळी त्यांनी सांगितलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress ashok chavan on mns protest against rahul gandhi over veer savarkar statement sgy