कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीत जनतेचे मोठे समर्थन काँग्रेस पक्षाला मिळत असल्याचं चित्र आहे. त्यामुळे जनता काँग्रेसला बहुमताने विजयी करेल. काँग्रेस पक्षच सर्वांना बरोबर घेऊन विकास करु शकतो, हा जनतेला विश्वास आहे. भाजपाला कर्नाटकात नॅनो कारमध्ये बसावे लागेल अशी होईल, असं विधान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलं आहे. ते साताऱ्यात प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.

“कर्नाटकमध्ये भाजपाला पोषक वातावरण नसल्याने ‘द केरला स्टोरी’ चित्रपटाचा आधार घेत जनतेत तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला. परंतु, भाजपाच्या अशा कोणत्याच भुलथापांना कर्नाटकची जनता बळी पडणार नाही. ‘काश्मीर फाईल्स’ चित्रपटाचं भांडवल करत भाजपाने काश्मिरी पंडितांवर अत्याचार होत असल्याचा डांगोरा पिटला. काश्मीरमध्ये राज्यपाल आहेत, केंद्रात भाजपाची सत्ता आहे. मग काश्मिरी पंडितांवरचे अत्याचार थांबवण्यासाठी त्यांनी काय केल?,” असा सवाल नाना पटोलेंनी उपस्थित केला आहे.

maharashtra assembly election 2024 issue of bullying is effective in campaigning in three constituencies of Marathwada
मराठावाड्यातील तीन मतदारसंघांत गुंडगिरीचा मुद्दा प्रचारात प्रभावी
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Navri Mile Hitlarla
एजेवर येणार मोठे संकट, श्वेताच्या ‘त्या’ कृतीमुळे होणार अटक; ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिका नव्या वळणावर
loksatta readers feedback
लोकमानस: धोरणांचा प्रचार झालाच नाही
Pramod Mahajan Death Poonam Mahajan
‘प्रमोद महाजनांच्या हत्येमागे गुप्त हेतू’; पूनम महाजन म्हणाल्या, “आता अमित शाह आणि देवेंद्र फडणवीसांना…”
Strategies to Counter Terrorism Amit Shah statement at the conference of National Investigation Agency
दहशतवादाचा सामना करण्याची रणनीती; राष्ट्रीय तपास संस्थेच्या परिषदेत अमित शहा यांचे प्रतिपादन
kalyan east shinde shiv sena city chief mahesh gaikwad including nine expelled from shiv sena
कल्याण पूर्वेतील बंडखोर शहरप्रमुख महेश गायकवाड; यांच्यासह नऊ जणांची शिवसेनेतून हकालपट्टी
maharashtra vidhan sabha election 2024 congress leaders fails to get rebels to withdraw from pune seats
महाविकास आघाडीच्या या जागा धोक्यात, हे आहे कारण ! बंडखोरांना शांत करण्यात काँग्रेस नेत्यांना अपयश

हेही वाचा : “…तर नरेंद्र मोदी तुरुंगात जाऊ शकतात”, प्रकाश आंबेडकर यांचं विधान

“ते सत्तेत असतानाच काश्मिरी पंडितांवर अत्याचार वाढले आहेत. मणिपूरमध्येही भाजपाची सत्ता आहे. पण, तेथे दोन जनसमुदायात मोठा संघर्ष पेटला आहे. मणिपूर जळत असताना देशाचे पंतप्रधान व गृहमंत्री मात्र कर्नाटकात मताचा जोगवा मागत फिरत आहेत. भाजपाने बजरंग बलीच्या नावावरही मते मागण्याचा प्रयत्न केला. मात्र, भाजपाचा तो मुद्दाही कर्नाटकात चालला नाही. बजरंग बलीचा आशिर्वाद काँग्रेसबरोबर आहे. कर्नाटकात काँग्रेसचेच सरकार येणार आहे. त्यामुळे तेथे ऑपरेशन लोटस करण्याची वेळच भाजपावर येणार नाही. जनताच भाजपाचे ऑपरेशन करणार आहे,” असे नाना पटोलेंनी म्हटलं.

हेही वाचा : “पृथ्वीराज चव्हाणांना काँग्रेसमध्ये स्थान काय?”, शरद पवारांच्या विधानावर नाना पटोलेंचं प्रत्युत्तर; म्हणाले…

“भाजपा खोटारडा पक्ष असून ऐनकेन प्रकारे सत्ता मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मागील विधानसभा निवडणूक निकालानंतर कर्नाटमध्ये काँग्रेसने सत्ता स्थापन केली होती. मध्यप्रदेश मध्येही काँग्रेस पक्षाने सत्ता स्थापन केली होती. पण, जनतेचा कौल भाजपा मान्य करत नाही. त्यांच्याजवळ सीबीआय, ईडी सारख्या सरकारी यंत्रणा आहेत. या सरकारी यंत्रणांचा मोदी सरकार सत्तेसाठी दुरुपयोग करत असते, हे देशातील जनतेने पाहिले आहे. महाराष्ट्रातही आमदारांची खरेदी करून भाजपाने महाविकास आघाडीचे सरकार पाडले. कर्नाटकात मात्र यावेळी भाजपाच्या ४० टक्के कमीशनवाल्या सरकारला घरी बसवण्याचा निर्णय कर्नाटकच्या जनतेनं घेतल्याचे दिसत आहे,” असं नाना पटोले म्हणाले.