लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने महाराष्ट्रातील उमेदवारांची चौथी यादी आज (१० एप्रिल) जाहीर केली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील दोन मतदारसंघाचा समावेश आहे. यासंदर्भातील माहिती काँग्रेसच्या अधिकृत एक्स (ट्विटर) अकाउंटवरुन देण्यात आली आहे. यामध्ये जालना लोकसभा मतदारसंघातून डॉ.कल्याण काळे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

धुळे लोकसभा मतदारसंघातून शोभा बच्छाव यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. काँग्रेसने जालना लोकसभा मतदारसंघातून कल्याण काळे यांना उमेदवारी दिल्यामुळे आता जालण्यात भाजपाचे रावसाहेब दानवे यांच्याशी त्यांची लढत होणार आहे. तसेच धुळे लोकसभा मतदारसंघात शोभा बच्छाव यांच्या विरोधात भाजपाचे सुभाष भामरे असणार आहेत.

हेही वाचा : मोठी बातमी! भाजपाचे पुन्हा धक्कातंत्र; चार विद्यमान खासदारांचा पत्ता कट, ‘या’ नव्या चेहऱ्यांना दिली संधी

दरम्यान, कल्याण काळे हे माजी आमदार आहेत. तसेच त्यांना काँग्रेसचे निष्ठावंत म्हणून ओळखले जाते. २००९ मध्ये कल्याण काळे यांनी रावसाहेब दानवे यांच्याविरोधात लोकसभेची निवडणूक लढवली होती. यामध्ये त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते.

धुळे लोकसभा मतदारसंघातून शोभा बच्छाव यांना उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. शोभा बच्छाव या नाशिकच्या माजी महापौर आहेत. तसेच त्यांनी राज्यमंत्री म्हणूनही काम पाहिलेले आहे.

Story img Loader