चंद्रपूर लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेसकडून उमेदवारी मिळाल्यानंतर प्रतिभा धानोरकर नागपुरात दाखल झाल्या. नागपूर विमानतळावर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी प्रतिभा धानोरकर यांचं जंगी स्वागत केलं. यावेळी त्यांनी भाजपाविरोधात जोरदार टीका केली. ही लढाई सोपी नाही, लोकशाही विरुद्ध हुकूमशाही अशी आहे असं प्रतिभा धानोरकर यांनी म्हटलं आहे.

काय म्हणाल्या प्रतिभा धानोरकर?

“२०१९ च्या निवडणुकीत असाच संघर्ष बाळू धानोरकर यांना करावा लागला होता. दहा महिन्यापूर्वी त्यांचं निधन झालं. त्यानंतर ही जबाबदारी माझ्या खांद्यावर दिली. ही जबाबदारी मी पार पाडेन, मला यश मिळेल असा विश्वास वाटतो. मला उमेदवारी दिल्यानं महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षातील नेत्यांचे आभार.”

Kangana Ranaut criticism that Priyanka Gandhi has no respect for democracy
प्रियंका गांधीना लोकशाहीचा आदर नाही,कंगना रानौतची टीका..
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
jharkhand assembly election 2024 amit shah attack at rahul gandhi
झारखंडमध्ये ‘राहुल विमान’ कोसळणार! केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची टीका
those claiming hindus in danger denying reservation to marathas says manoj jarange patil
‘हिंदू खतरे में’ म्हणणाऱ्यांचे मराठ्यांकडे दुर्लक्ष; मनोज जरांगे यांची महायुतीवर टीका
Oppositions stole promises along with schemes criticized Eknath Shinde in Ambernath
“विरोधकांनी योजनांसह वचननामाही चोरला…”, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची अंबरनाथमध्ये टीका
Arjuni Morgaon Constituency , Ajit Pawar, Manohar Chandrikapure,
विदर्भात अजित पवारांची भाजपकडून कोंडी
Nitin Gadkari Umarkhed, Nitin Gadkari Kisan Wankhade,
“काँग्रेसने जातीयवाद आणि सांप्रदायिकतेच विष कालवले,” नितीन गडकरी यांची यवतमाळात टीका

राजा बोले आणि दाढी हले असं होणार नाही

“राजा बोले आणि दाढी हले असं अजिबात होणार नाही”, असंही प्रतिभा धानोरकर म्हणाल्या आहेत. दरम्यान, चंद्रपूर लोकसभेसाठी काँग्रेसकडून प्रतिभा धानोरकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर, त्यांच्यासोबतच विजय वडेट्टीवार आणि शिवानी वडेट्टीवार यांचीही नावं चर्चेत होती. मात्र, दिल्ली हायकमांडनं प्रतिभा धानोरकर यांना उमेदवारी दिली आहे.

“मात्तबर मंत्री अशी ओळख असलेले सुधीर मुनगंटीवार माझ्या विरोधात असल्यानं माझी ही लढाई हवी तेवढी सोपी नाही, त्यांना राजकारणच दांडगा अनुभव आहे. माझ्यासाठी ही लढाई लोकशाही विरुद्ध हुकूमशाही अशी आहे. संघर्ष केल्याशिवाय माणूस मोठा होत नाही. मी एक स्टेटस ठेवला होता, जितना संघर्ष ज्यादा होगा जीत उतनी शानदार होगी. भारतीय जनता पक्ष हा हुकूमशाही पद्धतीनं चालणारा पक्ष आहे. राजा बोले आणि दाढी हले, अशी परिस्थिती पक्षाची आहे.”, असं काँग्रेस नेत्या प्रतिभा धानोरकर म्हणाल्या आहेत.

हे पण वाचा- चंद्रपूरच्या जागेचा तिढा सुटला; प्रतिभा धानोरकर काँग्रेसच्या उमेदवार

“आमचा पक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानावर चालणार आहे. संविधानात सांगितलं की, प्रत्येकाला दावेदारी करण्याचा नैतिक अधिकार आहे. आमची लढाई हुकुमशाही विरुद्ध लोकशाही अशी आहे. त्यामुळे सगळे एकत्र येऊन काम करतील. आमचा पक्ष संविधान आणि लोकशाहीवर चालणारा पक्ष आहे. त्यामुळे पक्षाचं जे काही ध्येय-धोरण असेल, त्यानुसार त्यांना (वडेट्टीवार) उमेदवारी मिळाली असती. तर मी आदेश फॉलो केले असते. मला उमेदवारी मिळाली तर ते पक्षाचे आदेश फॉलो करतील. ही आमची सगळ्याची लढाई असल्याने तळागाळातील सगळे पदाधिकारी एकत्र येऊन ही निवडणूक आम्ही लढू. विरोधी पक्षनेते म्हणून मी त्यांना (वडेट्टीवार) निमंत्रण देईल आणि ते येतील असा विश्वास आहे.”, असं काँग्रेस नेत्या प्रतिभा धानोरकर म्हणाल्या आहेत.