रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धाने आज एका भारतीय विद्यार्थ्याचा बळी घेतला. या युद्धाचा आजचा सहावा दिवस असून रशियाकडून युक्रेनवर हवाई हल्ले सुरूच आहेत. युक्रेनची राजधानी किव्ह आणि खार्कीव्हवर सुरु असणाऱ्या हल्ल्यांमध्ये या भारतीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. परराष्ट्र मंत्रालयाकडून देखील ही माहिती देण्यात आली आहे. यावरून आता मोदी सरकारवर काँग्रेसकडून टीका केली जात आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. “युक्रेन मधील भारतीय विद्यार्थ्यांचा झालेला मृत्यू हा मोदी सरकारच्या अनास्था, गैरकारभार व बेफिकीर वृत्तीमुळे केला गेलेला सदोष मनुष्यवध आहे.”, असा आरोप सचिन सावंत यांनी केलेला आहे.

अशा बेफिकीर वृत्तीमुळे मागील आठ वर्षांत अनेकांना प्राणास मूकावं लागलं –

सचिन सावंत म्हणाले की, “युक्रेनमध्ये भारतीय विद्यार्थ्याचा झालेला मृत्यू हा केवळ मोदी सरकारच्या अनास्थेमुळे गैरकारभारामुळे आणि बेफिकीर वृत्तीमुळे झालेला आहे, यात कोणतीही शंका नाही. हा खऱ्या अर्थाने सदोष मनुष्यवध आहे. हे देखील नमूद करण्याची आवश्यकता आहे. अशा पद्धतीच्या बेफिकीर वृत्तीमुळे मागील आठ वर्षांत अनेक लोकांना प्राणास मूकावं लागलेलं आहे. नोटबंदी जाहीर करण्यात आली, त्यावेळी शेकडो लोक रांगेत गेले. ज्या पद्धतीने लॉकडाउन जाहीर करण्यात आला. कोट्यावधी लोकाना रस्त्यावर चालाव लागलं, त्यातही लोक मेली. त्याच पद्धतीने करोनात गैरव्यवस्थापन आपण पाहीलं. गंगेत मृतदेह वाहून जाताना पाहिले, ऑक्सिजन अभावी लोक तडफडून मरतान पाहिली. मोदी सरकारच्या दृष्टीकोनातून निवडणुकांपुरतं हे शासन मर्यादित आहे. इव्हेंटबाजीपुरतं मर्यादित आहे आणि एकंदरच केवळ सत्तेकरिता मर्यादित आहे यात कुठलीही शंका नाही. लोकानी आपल्याला निवडून दिलेलं आहे ते लोकाना चांगलं व्यवस्थापन देण्यासाठी, त्यांचं जीवनमान सुधारण्यासाठी, संकटामध्ये मदत करण्यासाठी ही कुठल्याही तऱ्हेची तमा या गोष्टीची त्यांना नाही राहिलेली.”

Kangana Ranaut criticism that Priyanka Gandhi has no respect for democracy
प्रियंका गांधीना लोकशाहीचा आदर नाही,कंगना रानौतची टीका..
Daily Horoscope 18 November 2024 in Marathi
१८ नोव्हेंबर पंचांग: संकष्टी चतुर्थी १२ पैकी कोणत्या…
jharkhand assembly election 2024 amit shah attack at rahul gandhi
झारखंडमध्ये ‘राहुल विमान’ कोसळणार! केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची टीका
rbi governor shaktikanta das on inflation risks and slowing growth
चलनवाढीसह विकासवेग मंदावण्याचा धोका ; शक्तिकांत दास
Nitin Gadkari Umarkhed, Nitin Gadkari Kisan Wankhade,
“काँग्रेसने जातीयवाद आणि सांप्रदायिकतेच विष कालवले,” नितीन गडकरी यांची यवतमाळात टीका
Navri Mile Hitlarla
एजेवर येणार मोठे संकट, श्वेताच्या ‘त्या’ कृतीमुळे होणार अटक; ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिका नव्या वळणावर
पुन्हा ‘३७० कलम’ राहुल गांधींना आता कायमचे अशक्य- अमित शहा यांचे काँग्रेसवर टीकास्र
Pramod Mahajan Death Poonam Mahajan
‘प्रमोद महाजनांच्या हत्येमागे गुप्त हेतू’; पूनम महाजन म्हणाल्या, “आता अमित शाह आणि देवेंद्र फडणवीसांना…”

… आणि अंगावर आल्यानंतर लोकाना मदतीचं नाटक केलं जातय –

तसेच, “युक्रेनमध्ये जे घडलं ते अत्यंत दुर्दैवी आहे. गेल्या महिना-दीड महिन्यापासून युद्धजन्य परिस्थिती तिकडे आहे. तिथली आपली मूलं संकटात आहेत. त्यावेळी केवळ अॅडव्हायझरी काढून यांनी हात मोकळे केले आणि निवडणुकांमध्ये व्यग्र राहीले. आता निवडणुकांमधून त्यांना थोडीपार उसंत मिळाली आणि अंगावर आल्यानंतर लोकाना मदतीचं नाटक केलं जातय. त्याततही अत्यंत गंभीर बाब म्हणजे, जी मूलं येताय त्यांचा देखील सत्तेच्या राजकारणासाठी आणि गाजावाजासाठी वापर केला जातोय व आपली पाठ थोपटवून घेतली जातेय. हे निश्चितपणे दुर्दैवीच नव्हे तर अत्यंत क्लेशदायक आहे. म्हणूनच आम्ही या बेफिकीर वृत्तीचा या अनास्थेचा आम्ही जाहीर निषेध करत आहोत.” असंही सचिन सावंत यांनी म्हटलं आहे.

…तर नवीनचा जीव वाचला असता – नाना पटोले

याचबरोबर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देखील मोदी सरकारवर टीका केली आहे. “शेवटी ज्याची भीती वाटत होती तेच झाले. युक्रेनमध्ये हल्ल्यात आमच्या देशातील एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. मोदी सरकारने वेळीच विद्यार्थ्यांना मदत केली असती तर नवीनचा जीव वाचला असता.” असं पटोले म्हणाले आहेत.

तर, “महाराष्ट्र सरकारच्या राजकीय विरोधाचा बदला महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना त्रास देऊन घेऊ नका. महाराष्ट्रातील अनेक विद्यार्थ्यांना युक्रेनमधील दूतावासाची मदत मिळत नाही, त्यांचा कुटुंबाशी संपर्क तुटला आहे, त्यांना शोधा आणि सुखरूप घरी परत आना मोदीजी.” असंही नाना पटोले यांनी ट्वीट केलेलं आहे.

Ukraine War: एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू; रशियन सैनिकांनी खार्कीव्हमध्ये केलेल्या गोळीबारात गमावले प्राण

परराष्ट्र मंत्रालयाने आज सकाळी खार्कीव्हवर रशियाने केलेल्या हवाई हल्ल्यामध्ये एका भारतीय विद्यार्थ्याचा हल्ल्यामध्ये मृत्यू झाल्याचं सांगितलंय. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंधम बागची यांची ट्विटरवरुन यासंदर्भातील माहिती दिलीय.