राफेल विमान घोटाळा प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रिलायन्सचे अनिल अंबानी या दोघांची नार्को टेस्ट करा अशी मागणी आता काँग्रेसने केली आहे. राफेल करारासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा केली आहे. या चर्चेत परराष्ट्र मंत्री, संरक्षण मंत्री, संरक्षण सचिव, हवाई दलाचे प्रमुख यांच्यापैकी कोणीही हजर नव्हते. त्यामुळे राफेल खरेदीचा घोटाळा हा देशातला सर्वात मोठा घोटाळा आहे असाही आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस आणि प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला. ठाणे शहर कमिटीच्या कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत सावंत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अनिल अंबानी या दोघांचीही नार्को टेस्ट करण्याची मागणी केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

घर-घर मोदी हा नारा देणारे नरेंद्र मोदी आता डर डर मोदी आणि थर थर मोदी झाले आहेत अशीही टीका सचिन सावंत यांनी केली. राफेल प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने मोदी सरकारला क्लीन चिट दिली, कारण खोटं बोलून न्यायालयाची दिशाभूल करण्याचे काम या सरकारने केले आहे. संसदेच्या विशेष अधिकाराचे उल्लंघनही मोदी सरकारने केले आहे. राफेल घोटाळा हा देशाचे नुकसान करणारा, देशाची सुरक्षा धोक्यात आणणारा आणि देशाचे नुकसान करणारा घोटाळा आहे. हा घोटाळा फक्त मोदींच्या मित्रमंडळींसाठी फायद्याचा ठरला आहे अशीही टीका सचिन सावंत यांनी केली.

राफेल प्रकरणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खासगी कंपनीचे मध्यस्थ म्हणून काम केल्याचे सिद्ध झाले आहे. यासाठी त्यांनी सर्वोच्च न्यायालयात चुकीचे प्रतिज्ञापत्र दाखल करुन सर्वोच्च न्यायालयाचा अवमान केला आहे. मोदी यांना जनतेच्या न्यायालयातच शिक्षा होईल, यासाठी राफेल घोटाळा प्रकरणाचा पर्दाफाश करण्यासाठी येत्या काळात जनतेत जाऊन पाठपुरावा करणे, प्रबोधन करणे, पत्रकार परिषदा आयोजित करणे, आंदोलन करणे याद्वारे काँग्रेस पक्ष कार्यरत राहील, असे सचिन सावंत यांनी सांगितले.