जिल्ह्य़ातील दोन्ही लोकसभा मतदारसंघांत काँग्रेस आघाडीच्या उमेदवारांनी आत्तापर्यंतच्या निवडणूक खर्चात आघाडी घेतली आहे. मगर मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार राजीव राजळे यांचा खर्च ३८ लाख १२ हजार ६७० रुपये तर, शिर्डी मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे यांचा खर्च ४० लाख ६ हजार ९८३ रुपये झाला आहे.
निवडणूक आयोगाच्या नियमानुसार लोकसभा निवडणुकीतील उमेदवारांच्या दि. १३ पर्यंत झालेल्या खर्चाची तपासणी करण्यात आली. वरील दोन उमेदवारांचा हा खर्च दिसत असला तरी त्यात तफावतही निघाली असून त्याच्या नोटिसा या उमेदवारांना बजावण्यात आल्या आहेत.
नगर मतदारसंघात राजळे यांनी ३८ लाख १२ हजार ६७० रुपयांचा खर्च सादर केला आहे. मात्र निवडणूक खर्च निरीक्षकांनी त्यात तब्बल ७ लाख ५४ हजार रुपयांची तफावत काढली असून या रकमेच्या नोटीस त्यांना बजावण्यात आली आहे. ती मान्य झाली तर हा खर्च ४५ लाखांवर जाईल. भारतीय जनता पक्षाचे उमेदवार दिलीप गांधी यांचा खर्च २० लाख ९९ हजार ४४२ रुपयांवर पोहोचला आहे. त्यांच्याही नोंदीत ५ लाख ५२ हजार ९७५ रुपयांची तफावत आढळली असून त्यांनाही या तफावतीबद्दल नोटीस धाडण्यात आली आली आहे. ती मान्य झाली तर त्यांचा खर्च २६ लाख ५२ हजार रुपयांवर पोहोचेल. अन्य उमेदवारांचा खर्च पुढीलप्रमाणे आहे. बी. जी. कोळसे (अपक्ष)- १ लाख ३४ हजार ६१८, दीपाली सय्यद (आम आदमी पक्ष)- ४ लाख ६ जार ९३१, अजय बारस्कर (बहुजन मुक्ती पार्टी)- ४ लाख ७७ हजार ७६२, अनिल घनवट (अपक्ष)- ३ लाख १ हजार ५००. अन्य सर्व उमेदवारांचा खर्च १ लाख रुपयांपेक्षा कमीच झाला आहे.
शिर्डी मतदारसंघात सर्वाधिक खर्च झालेले उमेदवार वाकचौरे यांच्याही हिशोबात सुमारे ३८ हजार रुपयांची तफावत आढळली असून याबाबत त्यांना नोटीस पाठवण्यात आली आहे. शिवसेनेचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांचा २० लाख ४९ हजार १९३ रुपये खर्च झाला आहे. त्यांच्याकडे तफावत मात्र सुमारे २ लाख ४० हजार रुपयांची आढळून आली असून त्यांनाही याबाबत नोटीस बजावण्यात आली आहे. आम आदमी पक्षाचे उमेदवार नितीन उदमले यांचा खर्च ३ लाख ३८ हजार ९७३ रुपयांवर गेला आहे. त्यांच्या खर्चातही सुमारे १२ हजार रुपयांची तफावत असून त्यांनाही नोटीस पाठवण्यात आली आहे. अन्य काही उमेदवारांचा खर्च पुढीलप्रमाणे आहे. संतोष रोहम (बहुजन मुक्ती पार्टी)- २ लाख ७३ हजार ८७६, महेंद्र शिंदे (बहुजन समाज पार्टी)- १ लाख ५ हजार ४९१. अन्य सर्व उमेदवारांचा खर्च १ लाख रुपयांपेक्षा कमी आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा