रुपयाची ढासळती किंमत, गरिबी, बेरोजगारी, भ्रष्टाचार अशा एकाहून एक संकटे देशावर लोटली असताना केंद्रातील काँग्रेस सरकार चेहऱ्यावर धर्मनिरपेक्षतेचा बुरखा पांघरून बसले आहे. धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली जनतेच्या आशा-आकांक्षा दाबून ठेवल्या जाऊ शकत नाही, अशा शब्दांत गुजरातचे मुख्यमंत्री व भाजपच्या प्रचार समितीचे प्रमुख नरेंद्र मोदी यांनी रविवारी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला. रुपयाच्या किमतीपासून गरिबीपर्यंत आणि अन्नसुरक्षेपासून घराणेशाहीपर्यंतच्या सर्व मुद्दय़ांवर काँग्रेसला लक्ष्य करतानाच मोदी यांनी पुण्यात झालेल्या भाजपच्या निर्धार सभेत लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळही फोडला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

फग्र्युसन महाविद्यालयासह अन्य ठिकाणी काही कार्यक्रमांनिमित्त आलेल्या मोदी यांची निर्धार सभा बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाच्या पटांगणात आयोजित करण्यात आली होती. या वेळी बोलताना मोदी यांनी काँग्रेसवर टीका करण्याचा एकही मुद्दा सोडला नाही. परदेशी बँकांतील काळ्या पैशांचे संरक्षण करण्यामध्ये सरकार गुंतले आहे. या पैशाचे गरिबांना वाटप केले, तर प्रत्येकाला तीन लाख रुपये मिळतील. कोळसा भ्रष्टाचाराचे मूळ पंतप्रधान कार्यालयापर्यंत जात असेल, तर सरकारने त्याचा जाब द्यायला नको का, ‘सीबीआय’चा दुरुपयोग केला जात आहे. सरकार धर्मनिरपेक्षतेचा बुरखा परिधान करून बंकरमध्ये लपून राहते. धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली जनतेच्या आशा-आकांक्षा दाबून ठेवू शकत नाही. बेरोजगारीची समस्या, अत्याचार रोखू शकत नाही. त्याला ही धर्मनिरपेक्षतेची जडीबुटी कामाला येणार नाही, असा टोला मोदी यांनी लगावला.
मोदी उवाच..
आता रुपयाची किंमत घटली असून लवकरच केंद्रीय अर्थमंत्र्यांच्या वयाइतकी होईल. हेदेखील एक अर्थशास्त्रज्ञ पंतप्रधानपदावर असताना घडत आहे. दिल्लीतील नेते पैसे खाण्यामध्ये आणि लुटण्यामध्ये बुडलेले असल्याने ही परिस्थिती उद्भवली आहे.  
३५ वर्षांपूर्वी काँग्रेसने ‘गरिबी हटाव’ हा नारा दिला होता. प्रत्यक्षात गरिबी हटली का, ती का हटली नाही, याचा हिशेब काँग्रेसने द्यावा. काँग्रेस पक्षामध्ये शरम नावाची चीज शिल्लक नाही. गरिबी हटविणे तर दूरच, उलट लोकांना गरीब ठेवण्याचे काम काँग्रेसने केले. गरिबांना दोन वेळचे भोजन असंभव झाले आहे, तर युवराज केवळ प्रसिद्धीसाठी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना घेऊन गरिबांच्या झोपडीमध्ये जात आहेत.
संसदेला विश्वासात घेऊन आणि चर्चा करून अन्नसुरक्षा विधेयक करण्याऐवजी अध्यादेश काढण्याची घाई का केली जात आहे, असा प्रश्न उपस्थित करून मोदी म्हणाले, त्यांना मित्रपक्षांवर भरवसा नाही. हे विधेयक मंजूर झाले तर सरकारमधील पक्षांनाही त्याचे श्रेय मिळेल, या भीतीपोटीच हे राजकारण सुरू आहे.