स्वातंत्र्य वीर सावरकर आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार काँग्रेस पायदळी तुडवत आहे. राहुल गांधी हे सावरकर यांच्याबद्दल हीन बोलत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच बंड याच्याशीच निगडित आहे. असे विधान उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केलं आहे. तसेच, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेलं वक्तव्याबद्दल माहिती नाही. पण, छत्रपती शिवाजी महाराज हे देशाचे आराध्य दैवत आहे. त्यांच्याविषयी बोलताना आदराने आणि सन्मानाने बोललं पाहिजे ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. अशी अप्रत्यक्षरित्या नाराजी सामंत यांनी पिंपरी- चिंचवड शहरात लघु उद्योग संघटना मेळाव्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केली.

हेही वाचा- कोश्यारींच्या शिवाजी महाराजांवरील वादग्रस्त विधानानंतर संजय राऊतांचं मोठं विधान, म्हणाले “आम्ही लवकरच…”

उदय सामंत म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज हे अवघ्या देशाचं आराध्य दैवत आहेत. राज्यपाल हे काय बोलले आहेत हे मी ऐकलं नाही. न बघता आणि न ऐकता बोलणं योग्य ठरणार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल सर्व जणांना आदर आहे. राज्यपाल काय बोलले आहेत हे मला खरच माहीत नाही. मी असो किंवा साधा कार्यकर्ता ह्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल बोलत असताना सन्मानाने आणि आदराने बोलावं. ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. पुढे ते म्हणाले की, स्वातंत्रवीर सावरकर यांच्या बद्दल राहुल गांधी हीन दर्जाच बोलत आहेत. त्यामुळं अख्खा महाराष्ट्र पेटून उठला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलेलं बंड हे याच गोष्टशी निगडित होत. सावरकर किंवा बाळासाहेब ठाकरे यांचे विचार काँग्रेस पायदळी तुडवत आहेत. राहुल गांधी यांनी केलेली टीका ही निंदनीय आहे. अस सामंत यांनी म्हटलं आहे. 

Story img Loader