निवडणूक आयोगाने ‘धनुष्यबाण’ निवडणूक चिन्हाबाबत मोठा निर्णय घेत हे चिन्ह तात्पुरतं गोठवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच दोन्ही गटाला हे शिवसेना हे नावही वापरता येणार नाही. दरम्यान, निवडणूक आयोगाच्या या निर्णयानंतर काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आज सकाळी ते माध्यमांशी बोलत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – ‘धनुष्यबाण’ चिन्ह गोठवल्यानंतर उज्वल निकम यांची प्रतिक्रिया; म्हणाले, “सर्वोच्च न्यायालयात…”

काय म्हणाले बाळासाहेब थोरात?

“माझ्या मते उद्धव ठाकरे समर्थ आहेत. त्याचबरोबर जो प्रकार सुरू आहे, ते जनता बघते आहे. राज्यात सुरू असलेले घाणेरडे राजकारण बघून जनता आपलं मत बनवत असते. त्यामुळे मी जास्त काही या विषयावर बोलणार नाही” , अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे.

पाहा व्हिडीओ –

हेही वाचा – शिवसेना पक्षनावासह चिन्हही गोठवले; केंद्रीय निवडणूक आयोगाचा हंगामी निर्णय, उद्धव ठाकरे गटाला धक्का

“आरएसएसने ते सिद्ध करावे”

यावेळी त्यांनी राहुल गांधींच्या सावरकरांबाबतच्या वक्तव्यावरून सुरू असेलल्या वादावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. “ही विचारांची लढाई आहे. या लढाईत वाद विवाद होतात. जर राहुल गांधींनी काही विचार मांडले असतील. तर त्याला त्यांनी उत्तर द्यावं, त्यांनी हे सिद्ध करावे, की आरएसएस ही संघटना स्वातंत्र लढ्यात सहभागी होती. त्यावरून माफी वगैरे मागायची गरज नाही”, असेही ते म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress leader babalasaheb thorat statement on eci freez bow and arrow sign spb
First published on: 09-10-2022 at 09:16 IST