Balasaheb Thorat On Vijay Wadettiwar : विधानसभेची निवडणूक तोंडावर आल्यामुळे निवडणुकीच्या अनुषंगाने सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. विविध नेत्यांचे महाराष्ट्रभर दौरे सुरु आहेत. या दौऱ्यांच्या माध्यमातून सभा, मेळावे, आढावा बैठका घेत आगामी निवडणुकीची चाचपणी केली जात आहे. यातच लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात महाविकास आघाडीला मिळालेल्या यशानंतर आघाडीतील नेत्यांचा आत्मविश्वास बळावल्याचं दिसत आहे. त्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीमधील राष्ट्रवादी शरद पवार गट, शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेस पक्ष राज्यभर मोर्चेबांधणी करताना दिसत आहेत.

सध्या राज्यभर सुरु असलेल्या सभा आणि मेळाव्यामधून सत्ताधारी आणि विरोधी पक्षाचे नेते एकमेकांवर टिक्का टिप्पणी करताना पाहायला मिळत आहे. त्यामुळे निवडणुकीच्या प्रचाराआधीच राज्यात राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. या सभामध्ये काही नेते एकमेकांवर मिश्किल टिप्पणी करतानाही दिसून येत आहे. अशातच आज काँग्रेस पक्षाचा अहमदनगर व नाशिक जिल्ह्यातील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा नाशिकमध्ये मेळावा पार पडला. या मेळाव्याला महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार यांच्यासह आदी नेते उपस्थित होते. या मेळाव्यात बोलताना काँग्रेसचे नेते, माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी विजय वडेट्टीवार यांना मिश्किल टोला लगावला. “विजय वडेट्टीवार हे आमचे रोड रोलर आहेत”, अशी मिश्किल टीप्पणी त्यांनी केली आणि व्यासपीठावर मोठा हशा पिकला.

Devendra Fadnavis rally in rains
Devendra Fadnavis: शिराळा येथे देवेंद्र फडणवीस यांचे भरपावसात भाषण; म्हणाले, “पावसात सभा झाली की…”
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
telangana news
भाजपाचे नेते काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांचे चीअरलीडर्स आहेत; केटी रामाराव यांचा आरोप!
ravi rana replied to ajit pawar
“…तेव्हा ‘विनाशकाले विपरीत बुद्धी’ आठवली नाही का? आता परिणाम भोगा”; रवी राणांचं अजित पवारांना प्रत्युत्तर!
What Sanjay Raut Said?
Sanjay Raut : “काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं बाळासाहेबांवर अधिक प्रेम आणि..”, संजय राऊत काय म्हणाले?
Ajit Pawar on Udyanraje Bhosale
Ajit Pawar: ‘साताऱ्याला पिपाणीनं वाचवलं, नाहीतर…’, अजित पवारांच्या मिश्किल टिप्पणीनं भाजपाचीच कोंडी
Sunil Tatkare on Jayant Patil
“जयंत पाटील आतल्या गाठीचे, त्यांनी…”, अजित पवार गटाकडून टीका; म्हणाले, ‘यावेळी त्यांचा करेक्ट कार्यक्रम करणार’

हेही वाचा : मोठी बातमी! मविआचा उद्याचा ‘महाराष्ट्र बंद’ मागे; शरद पवार, नाना पटोलेंनंतर उद्धव ठाकरेंकडूही भूमिका स्पष्ट

बाळासाहेब थोरात काय म्हणाले?

“आज अहमदनगर आणि नाशिक अशा दोन जिल्ह्यांची आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीला राज्याचे प्रभारी रमेश चेन्नीथला, नाना पटोले आले. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हे देखील या ठिकाणी आलेले आहेत. आम्हाला जर एखादी सभा शांत करायची असेल तर आम्ही सर्वात आधी त्यांना (विजय वडेट्टीवार) यांना भाषणासाठी उभं करतो. एकदा त्यांनी सभा शांत केली की त्यानंतर आम्ही भाषणं करतो. ते आमचे रोड रोलर आहेत. संपूर्ण सपाट करण्याची ताकद त्यांच्या आवाजात आहे”, असं म्हणत बाळासाहेब थोरात यांनी विजय वडेट्टीवार यांना मिश्किल टोला लगावला.

बाळासाहेब थोरात पुढे म्हणाले, “पुरोगामी विचारांना आपण कायम ताकद दिली. त्यामुळे महाविकास आघाडीचे सर्व उमेदवार उभे करण्याचं काम अहमदनगर आणि नाशिक या दोन्ही जिल्ह्यांनी केलं. अहमदनगर असेल किंवा नाशिक जिल्हा असेल. या जिल्ह्यात देखील मोठी लढाई होती. साधे कार्यकर्ते निवडणुकीत उभे राहिले. मात्र, जनता ज्यांच्या पाठीशी उभी राहते त्यांना घाबरण्याचं कारण नाही. हे दाखवण्याचं काम देखील जनतेनं केलेलं आहे”, असंही बाळासाहेब थोरात म्हणाले.