Congress छावा हा चित्रपट सध्या प्रचंड चर्चेत आहे. छत्रपती संभाजी महाराज, त्यांचं शौर्य, औरंगजेबाने त्यांचा केलेला छळ, अनन्वित अत्याचार केल्यानंतर त्यांची हत्या या सगळ्या गोष्टी या चित्रपटामुळे नव्याने चर्चेत आल्या आहेत. काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांनी आज वर्धा या ठिकाणी पत्रकारांशी संवाद साधत असताना गुरुजी गोळवलकर आणि वीर सावरकर यांच्याबाबत एक वक्तव्य केलं आहे. तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे याच वृत्तीचे पाईक आहेत असंही त्यांनी म्हटलं आहे. भिडे गुरुजींचा उल्लेख किडे गुरुजी असाही केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काय म्हटलं आहे हर्षवर्धन सपकाळ यांनी?

“मुँह मे राम नाम और बगल में छुरी ही भाजपाची मोडस ऑपरेंडी आहे. यांना संविधानाला अभिप्रेत असलेला समाजवाद, महात्मा गांधी, तुकडोजी महाराज, संत गाडगेबाबा, वारकरी संप्रदाय, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्या सगळ्यांच्या विचारांच्या विरोधात काम करणं हा भाजपाचा हेतू आहे. त्यासाठी मग कुणी आंबेवाला बाबा, कुंकू लावा त्याशिवाय बोलणार नाही असे किडे अर्थात भिडे प्रवृत्तीचे लोक यांच्याकडे आहे.” असं सपकाळ म्हणाले.

देवेंद्र फडणवीस याच विचारांचे पाईक-सपकाळ

पुढे सपकाळ म्हणाले सर्वात महत्त्वाचं म्हणजे छावा चित्रपट सर्वदूर गाजतो आहे. शिवजयंतीपासून काँग्रेस म्हणतं आहे की छावा चित्रपट हा टॅक्स फ्री करावा. मात्र केंद्र सरकार आणि राज्य सरकार यासाठी तयार नाही. चिटणीसांच्या बखरीत संभाजी महाराजांच्या विरोधात लिखाण करण्यात आलं आहे. बंच ऑफ थॉट्स या पुस्तकात गोळवलकर गुरुजींनी छत्रपती संभाजी महाराजांबाबत अत्यंत आक्षेपार्ह आणि निराधार असा बदनामीकारक मजकूर लिहिला आहे. सावरकरांनी छत्रपती संभाजी महाराजांबाबत अश्लील लिखाण केलं आहे. या विचारांचे पाईक मुख्यमंत्री आणि त्यांचं मंत्रिमंडळ आहे. त्यांची री ओढण्यासाठी संभाजी महाराजांवर आधारित चित्रपट टॅक्स फ्री करत नाही.” असंही सपकाळ यांनी स्पष्ट केलं.

संभाजी महाराजांबाबत वीर सावरकरांनी आक्षेपार्ह लिखाण केलं-सपकाळ

छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्याला सुरक्षा पुरवली जाते हे दुर्दैवी आहे असंही हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटलं आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर असं भाजपाकडून त्यांना म्हटलं जातं, मात्र त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांबाबत आक्षेपार्ह लिखाण केलं आहे. छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी केली आहे. त्याच सावरकरांना छत्रपती संभाजी महाराजांच्या नावे पुरस्कार जाहीर होतो असा सगळा खेळ भाजपाकडून सुरु आहे. या किडे प्रवृत्तीचा आम्ही निषेध नोंदवतो.