उद्योगपती गौतम अदाणी आणि मोदी यांच्यात जवळचे संबंध आहेत. अदाणी यांनी मागील २० वर्षात भाजपाला अनेक पैसे दिले, असा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला आहे. त्याचे पडसाद संसदेतही उमटले. मोदी काल (९ फेब्रुवारी) भाषणाला उभे राहताच विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी केली. या विरोधाला न जुमानता मोदींनी आपले भाषण सुरुच ठेवले. मात्र एका तासापेक्षाही जास्त भाषण करून त्यांनी काँग्रेसने केलेल्या आरोपांवर भाष्य केले नाही. यावरच आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मोदी यांनी काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं द्यावीत, असे नाना पटोले म्हणाले आहेत. ते आज (१० फेब्रुवारी) माध्यम प्रतनिधींशी बोलत होते.
हेही वाचा >>> एकनाथ शिंदेंना खुले आव्हान देणाऱ्या आदित्य ठाकरेंवर शीतल म्हात्रेंचे टीकास्र, म्हणाल्या “तुम्ही दोन आमदारांना…”
अदाणी समूहासोबतचे तुमचे संबंध, तुम्ही त्यांना किती कंत्राट दिले?
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर आहेत. येथे ते वेगवेगळ्या कार्यक्रमांना हजेरी लावतील. याबाबत विचारले असता “पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात येत असतील तर ही आमच्यासाठी आनंदाची बाब आहे. मात्र मागच्या दौऱ्यादरम्यान मी त्यांना महाराष्ट्रातील प्रश्नांची जाणीव करून दिली होती. आता राज्यातील प्रश्नांत वाढ झाली आहे. आमचे नेते राहुल गांधी यांना लोकसभेत काही प्रश्न विचारले आहेत. अदाणी समूहासोबतचे तुमचे संबंध, तुम्ही त्यांना किती कंत्राट दिले? ते तुमच्यासोबत किती दौऱ्यात होते. अगोदरही ते किती वेळा तुमच्या सोबत होते? असे प्रश्न त्यांना विचारण्यात आले. मात्र या प्रश्नांचे त्यांनी उत्तरं दिली नाहीत,” अशी टीका मोदी यांनी केली.
हेही वाचा >>> राज्यात पुन्हा राजकीय वादळ उठणार? बच्चू कडू यांच्या दाव्यानंतर चर्चेला उधाण; म्हणाले, “येत्या १५ दिवसांत…”
गल्लीबोळातील उद्घाटन करण्यापेक्षा…
“ते लोकसभेत बोलत नाहीत. मात्र बाहेर ते मन की बात म्हणतात. ते जनतेच्या मनातील ओळखतात असे म्हटले जाते. १४० कोटी लोक माझ्यासोबत आहेत, असे ते सांगतात. मग या देशातील ज्या माणासे एलआयसी, बँकेत पैसे भरलेले आहेत, ते सगळेच भयभयीत आणि संभ्रमात आहेत. राहुल गांधी यांनी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर मोदी लोकसभेत देऊ शकलेले नाहीत. मग त्यांनी याच प्रश्नांची उत्तरं मुंबईततरी द्यावे. गल्लीबोळातील उद्घाटन करण्यापेक्षा देशातील लोकांच्या मनात निर्माण झालेला संभ्रम त्यांनी मुंबईततरी दूर करावा,” अशी खोचक टीका पटोले यांनी केली.
हेही वाचा >>> पिंपरी चिंचवड पोटनिवडणूक : सचिन अहीर यांनी घेतली बंडखोर उमेदवार राहुल कलाटेंची भेट; म्हणाले, “आज…”
शेतकऱ्यांचे प्रश्न, बेरोजगारी, महागाई कशी कमी करणार?
“शेतकऱ्यांच्या आत्महत्या, बेरोजगारी, महागाई अशा प्रश्नांवर ते बोलायला तयार नाहीत. ते मुंबईत येत असतील तर त्यांचे स्वागत आहे. मात्र राहुल गांधी यांनी जे प्रश्न उपस्थित केले, त्याची उत्तरं त्यांनी दिली पाहिजेत. महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांचे प्रश्न, बेरोजगारी, महागाई कशी कमी करणार? या प्रश्नांची उत्तर त्यांनी द्यावीत,” असेदेखील पटोले म्हणाले.