Rahul Gandhi on Chhatrapati Shivaji Statue Collapse: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रात येऊन छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यामुळे माफी मागितली. पण त्यांनी माफी का मागितली असावी? यावर मी विचार करत होतो. कारण माफी तोच मागतो, ज्याच्याकडून चुकीचे काम होते. पतंगराव कदम यांनी आयुष्यात कधीही माफी मागितली नाही. कारण त्यांनी कधी चुकीचे कामच केले नव्हते. सांगलीत पतंगराव कदम यांच्या पुतळ्याचे आज अनावरण केले. हा पुतळा पुढचे ५०-६० वर्ष कोसळणार नाही, इतके चांगले काम केलेले आहे, असे सांगून लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर टीका केली.
सांगली येथे पतंगराव कदम यांच्या पूर्णाकृती पुतळा आणि स्मारकाचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे, लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण आणि काँग्रेसचे नेते उपस्थित होते. या कार्यक्रमात बोलत असताना राहुल गांधींनी भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली.
हे वाचा >> “जयदीप आपटेला अटक झाली आता कारवाई…”, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया
संघाच्या माणसाला काम दिल्यामुळे माफी मागितली असावी
सिंधुदुर्ग येथील मालवण समुद्रकिनारी असलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराजांची माफी मागितली. पण पंतप्रधानांनी कोणत्या कारणासाठी माफी मागितली, याचे कारण काय? यावर राहुल गांधींनी भाष्य केले. ते म्हणाले, पुतळा बनविण्याचे कंत्राट राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या व्यक्तीला दिले गेले, म्हणून माफी मागितली असावी. पुतळा बनविण्यात भ्रष्टाचार झाला असावा, म्हणूनही कदाचित माफी मागतिली असावी किंवा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बनविताना अक्षम्य दुर्लक्ष केल्याबद्दलही माफी मागितलेली असू शकते. मी याठिकाणी गॅरंटी देतो, सांगलीत उभारलेला पतंगराव कदम यांचा पुतळा अनेक दशके इथेच उभा असलेला दिसेल.
हे ही वाचा >> Surat Loot : सूरतेची महाराजांची लूट आणि मोदींचे १० वर्षांपूर्वीचे उद्गार… नक्की ऐका
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी फक्त छत्रपती शिवरायांचीच नाही तर महाराष्ट्रातील जनतेचीही माफी मागायला हवी, असेही राहुल गांधी म्हणाले. पंतप्रधान मोदी केवळ दोन लोकांसाठी सरकार का चालवत आहेत? यावरही त्यांनी बोलायला हवे. देशातील मोठ मोठी कंत्राटे अदाणी किंवा अंबानी यांनाच का मिळतात? यासाठी पंतप्रधानांनी कधीच माफी नाही मागितली. तीन कृषी कायदे आणल्यामुळे ७०० शेतकऱ्यांचा बळी गेला, त्यांच्यासाठी संसदेत कधीही माफी मागितली नाही. दोन व्यापारांचा फायदा करण्यासाठी जीएसटी, नोटाबंदी करून कोट्यवधी छोट्या व्यापाऱ्यांना देशोधडीला लावले, ज्यामुळे अनेकांचा रोजगार गेला, याबद्दलही पंतप्रधान कधी माफी मागणार का? असाही सवाल राहुल गांधी यांनी उपस्थित केला.