साताऱ्यातील किल्ले प्रतापगडावर असलेल्या अफझलखानाच्या कबरीजवळील अनधिकृत बांधकाम हटवण्यास सकाळपासून सुरूवात झाली आहे. या कबरीवरून काँग्रेस प्रवक्ते राजू वाघमारे यांनी भाजपावर सडकून टीका केली आहे. “अफझलखानाला हिरो बनवण्याचा प्रयत्न भाजपा आणि त्यांचे सहकारी पक्ष करत असतात. त्यातलाच हा एक प्रकार आहे” असं वाघमारे यांनी म्हटलं आहे. “अफझलखानाचं नाव घेत धर्मांमध्ये तेढ निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे. लोकांचं लक्ष मुलभूत समस्यांपासून भरकटवण्यासाठी या कुरापती करण्यात येत आहेत”, असा आरोप वाघमारे यांनी केला आहे.

साताऱ्यात अफजलखानाच्या कबरीजवळील अनधिकृत बांधकाम हटवण्यास सुरुवात, प्रतापगडाच्या पायथ्याशी चोख बंदोबस्त

Oppositions stole promises along with schemes criticized Eknath Shinde in Ambernath
“विरोधकांनी योजनांसह वचननामाही चोरला…”, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची अंबरनाथमध्ये टीका
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
What Justice Chandiwal Said About Sachin Waze?
Justice Chandiwal : जस्टिस चांदिवाल यांचं वक्तव्य, “सचिन वाझेंकडे भरपूर मटेरियल होतं, त्यांनी मला समित देशमुखांचा मेसेज..”
sana malik
Sana Malik : “नवाब मलिक तुरुंगात असताना पक्षातील लोकांनी…”, सना मलिक यांचा गंभीर आरोप!
Uddhav Thackeray criticized Eknath Shinde
“माझी बॅग तुझ्याकडे देतो, फक्त त्यातले कपडे…”; उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं!
Chief Minister Eknath Shinde and Deputy Chief Minister Ajit Pawar scolded Ravi Rana
“महायुतीत मिठाचा खडा टाकू नका”, मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्‍यमंत्री अजित पवारांनी रवी राणांना खडसावले
Uddhav Thackeray News Update News
“महाराष्ट्र दरोडेखोर अन् गुंडांच्या हाती”, उद्धव ठाकरेंची शिंदे गटावर सडकून टीका; पक्षचिन्हावरून माजी सरन्यायाधीशांनाही केलं लक्ष्य; म्हणाले…
mallikarjun kharge replied pm narendra
“पंतप्रधान मोदी म्हणजे ‘झुटों के सरदार’, त्यांनी हेच लाल संविधान…”; ‘त्या’ टीकेला मल्लिकार्जून खरगेंचं प्रत्युत्तर!

“अनधिकृत बांधकामं पाडायलाचं हवीत, पण धर्माच्या नावावर हा प्रकार सुरू असेल, तर हा खेळ त्यांनी थांबवावा”, असं आवाहन वाघमारे यांनी केलं आहे. निवडणुका जवळ आल्यानं धर्मांमध्ये द्वेष पसरवण्याचं काम शिंदे-फडणवीस सरकार करत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

“ज्यांनी शिवसेना फोडली, धनुष्यबाण चिन्ह गोठवलं त्यांच्या…”; तुरुंगातून बाहेर पडताच संजय राऊतांचा CM शिंदेंवर हल्लाबोल

महाबळेश्वर तालुक्यातील किल्ले प्रतापगडावर पहाटेपासून अफजलखानाच्या कबरीजवळील अनधिकृत बांधकाम हटवण्यात येत आहे. यासाठी सातारा, पुणे, सोलापूर, कोल्हापूर, सांगली ग्रामीण या चार जिल्ह्यातील १८०० हून अधिक पोलीस प्रतापगडावर तैनात करण्यात आले आहेत. प्रतापगड, महाबळेश्वर, वाई, कराड, साताऱ्यामध्येही पोलिसांना मोठा बंदोबस्त आहे. या परिसरात जमावबंदीचे १४४ कलम लागू करण्यात आले आहे.

“ईडीनं मर्जीच्या आरोपींना अटक केली यात शंका नाही, पण संजय राऊत…”, अंजली दमानियांची टीका!

अफजलखानाच्या कबरी शेजारी उदात्तीकरण करण्यासाठी वनविभागाच्या हद्दीत अनेक खोल्यांचे अनधिकृत बांधकाम करण्यात आले आहे. ते पाडून टाकण्याची मागणी हिंदुत्ववादी संघटनांनी केली होती. न्यायालयानेही हे बांधकाम पाडण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार साताऱ्याचे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, पोलीस अधीक्षक समीर शेख, वाईचे प्रांताधिकारी राजेंद्र जाधव यांच्या देखरेखीत हे पाडकाम करण्यात येत आहे.