लोकसभा निवडणुकीत भाजपला महाराष्ट्रात दारुण पराभव स्वीकारावा लागला. मुंबईत फक्त एक जागा जिंकता आली. तर महायुतीने ही सपाटून मार खाल्ला. परंतु काही मतदारसंघात फार कमी मताधिक्याने महायुतीला पराभव स्वीकारावा लागला. यावरून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव आणि आदित्य ठाकरे यांना टोला लगावला होता. या टीकेवर काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी पलटवार केला आहे.
काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
वरळीसारख्या मतदारसंघात केवळ सहा हजारांचा लीड शिवसेनेला मिळाला. या ठिकाणी स्वतः आदित्य ठाकरे तर आहेतच. आदित्य ठाकरेंना आमदार बनवण्याकरता दोन अजून आमदार या वरळीमध्ये तयार केले. त्याठिकाणी केवळ सहा हजार मतांचा लीड हे क्लिअर इंडिकेटर आहे, हे थर्मामीटर आहे. टेंपरेचर कुठे आहे हे आपल्या लक्षात येत आहे. त्यामुळे आपल्याला काळजी करण्याचं कारण नाही”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
सचिन सावंत यांची प्रतिक्रिया काय?
फडणवीस साहेबांचे भाषण म्हणजे “गिरे तो भी टांग उपर” होते. मुंबईतील ६ पैकी चार जागा हरल्या आणि दोन जिंकलेल्या जागांपैकी एक जागा केवळ ४८ मतांनी ती ही विवादास्पद जिंकली तरी, फडणवीस साहेब वरळी येथे शिवसेनेला मिळालेले मताधिक्य केवळ ६००० आहे असे म्हणतात. जरा बाजूला बसलेल्या मुंबई भाजपाचे अध्यक्ष यांच्या वांद्रे पश्चिम मतदारसंघात भाजपाला किती मताधिक्य मिळाले विचारले असते तर बरे झाले असते. त्यांनी आकडा सांगितला असता ३६०६. वैसे “दिल के ख़ुश रखने को ‘ग़ालिब’ ये ख़याल अच्छा है”” असा उपहासात्मक टोला त्यांनी लगावला.
मुंबईत कोणत्या पक्षाला किती जागा
शिवसेना (ठाकरे गट) शिवसेना (शिंदे गट) काँग्रेस भाजपा
३ १ १ १
मुंबई महाविकास आघाडी वि. महायुती, कोण ठरलं अव्वल?
महाविकास आघाडी महायुती
४ २
मतदारसंघ विजयी उमेदवार एकूण मते
मुंबई दक्षिण मध्य अनिल देसाई ३९५१३८
मुंबई दक्षिण अरविंद सावंत ३९५६५५
मुंबई उत्तर पश्चिम रवींद्र वायकर ४५२६४४
मुंबई उत्तर पीयूष गोयल ६८०१४६
मुंबई उत्तर मध्य वर्षा गायकवाड ४४५५४५
मुंबई उत्तर पश्चिम संजय दिना पाटील ४५०९३७