काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी ‘भारत जोडो यात्रे’दरम्यान स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल केलेल्या विधानंतर राजकीय वातावरण तापलं होतं. मनसे, शिंदे गट आणि भाजपाचे नेत्यांनी राहुल गांधींविरोधात आक्रमक पवित्रा घेतला होता. त्यातच आता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याने राजकीय वातावरण अधिकच चिघळताना दिसत आहे. त्यांच्या या विधानाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी राज्यपाला कोश्यारींवर टीका केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – “महाराष्ट्र तुमच्या सरकारवर थुंकतो आहे; आता तुमचा स्वाभिमान कुठे गेला?”; संजय राऊतांचा मुख्यमंत्री शिंदेना सवाल!

“छत्रपती शिवाजी महाराज देशासाठी आदर्श होते, आहेत व राहतील. इतके वर्ष महाराष्ट्रात काढूनही महाराष्ट्राचा विचार, संस्कृती, आस्था व परंपरा न कळणं यापेक्षा दुर्दैव नाही. राज्यपाल पदाची प्रतिष्ठा कधी नव्हे इतकी या काळात खाली आली आहे. संघ प्रचारकपद कायम डोक्यात असल्याने हे होते. निषेध!” अशा शब्दांमध्ये ट्वीट करत सचिन सावंत यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर टीका केली आहे.

हेही वाचा – “छत्रपतींनी जर माफी मागितली, तर मग पंतप्रधान मोदी महाराष्ट्रात…”; संजय राऊतांचं विधान!

राज्यपाल कोश्यारी काय म्हणाले? –

“तुमचा आदर्श कोण आहे, असे जेव्हा पूर्वी विचारले जात असे तेव्हा, ‘जवाहरलाल नेहरू, सुभाषचंद्र बोस आणि महात्मा गांधी’ अशी उत्तरे दिली जात असत. परंतु, महाराष्ट्रात तुम्हाला आदर्श शोधण्याची गरज नाही, कारण इथे खूप आदर्श आहेत. छत्रपती शिवाजी महाराज जुन्या काळातील, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि नितीन गडकरी हे नव्या काळातील आदर्श आहेत,” असे वक्तव्य राज्यपाल कोश्यारी यांनी केलं. ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या ६२ व्या दीक्षान्त समारंभात बोलत होते.

हेही वाचा – “…नाहीतर जोडे काय असतात आणि कसे मारले जातात हे शिवसेना दाखवल्याशिवाय राहणार नाही”; संजय राऊतांचा इशारा!

सुधांशु त्रिवेदी नेमंक काय म्हणाले? –

राहुल गांधींनी सावरकरांवर केलेल्या आक्षेपार्ह विधानाबाबत ‘आज तक’ने चर्चासत्र भरवलं होतं. या चर्चासत्रात भाजपाची भूमिका मांडण्यासाठी प्रवक्ता म्हणून सुधांशु त्रिवेदी यांनी उपस्थिती लावली होती. यावेळी आपली बाजू मांडताना सुधांशु त्रिवेदी म्हणाले, “सावकरांनी ब्रिटीशांची माफी मागितली होती, असं सांगण्याचा प्रयत्न राहुल गांधींनी केला. त्या काळात अनेक लोकं प्रस्तावित फॉरमॅटमधून (Prescribed Format) बाहेर निघण्यासाठी माफी मागायचे. छत्रपती शिवाजी महाराजांनीदेखील पाचवेळा औरंगजेबाला पत्र लिहिलं होतं. मग याचा अर्थ काय झाला? पण सावकरांनी ब्रिटीश संविधानाची शपथ तरी घेतली नव्हती” असं वक्तव्य त्रिवेदी यांनी केलं आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress leader sachin sawant criticizes governor bhagat singh koshyari msr