मोदी सरकार केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करत असल्याचा आरोप विरोधकांकडून सातत्याने केला जात आहे. काँग्रेसकडून या मुद्द्यावर तीव्र आक्षेप आणि नाराजी व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून या मुद्द्यावरून पुन्हा एकदा मोदी सरकारवर टीकास्त्र सोडण्यात आलं आहे. यासाठी विक्रम आणि वेताळच्या गोष्टीचा संदर्भ घेत त्यातील उपमा केंद्रीय तपास यंत्रणांना देण्यात आली आहे. महाराष्ट्र काँग्रेसचे सरचिटणीस सचिन सावंत यांनी यासंदर्भात केलेलं एक ट्वीट सध्या व्हायरल होत आहे.

शिवसेना खासदार संजय राऊत यांचे बंधू आणि व्यावसायिक प्रविण राऊत यांना ईडीनं अटक केल्यानंतर त्यावरून सचिन सावंत यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. “राष्ट्रीय तपास यंत्रणा ‘विक्रम आणि वेताळ’च्या वेताळासारख्या आहेत. फरक हाच की विक्रम बोलला तर वेताळ खांद्यावरून उडून जायचा. मोदींचा वेताळ, मोदी सरकारच्या विरोधात बोलले कि बोलणाऱ्याच्या खांद्यावर बसतो”, असं सचिन सावंत यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

Manmohan Singh launched the Technology Mission on Citrus for orange growers in Vidarbha
डॉ.मनमोहन सिंग, नागपूरची संत्री आणि ‘मिशन सिट्रस’
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
77 lakh fraud by cyber thieves, lure of investment ,
पुणे : गुंतवणुकीच्या आमिषाने सायबर चोरट्यांकडून ७७ लाखांची फसवणूक
Bajrang Sonavane Demand
Bajrang Sonavane : “अजित पवारांनी बीडचं पालकमंत्रिपद घ्यावं, त्यांना अंधारात कोण काय…”, बजरंग सोनावणेंची मागणी
Heart touching video of a kid crying and asking mother to come early from work emotional video viral on social media
रडत रडत तिच्याजवळ गेला अन्…, कामावर जाणाऱ्या आईला मुलाची विनवणी, VIDEO पाहून तुमचेही डोळे पाणावतील
software exports maharashtra
‘आयटी’त पुण्याचा झेंडा! सॉफ्टवेअर निर्यातीत मुंबई, नागपूरपेक्षा अव्वल कामगिरी
loksatta editorial centre to end no detention policy for students in classes 5 and 8 in schools
अग्रलेख: नापास कोण?
Chandrashekhar Bawankule On Uddhav Thackeray
Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल; म्हणाले, “२०१९ मध्ये मोठी गद्दारी…”

हा वेताळ म्हणतो, “तू बोला, मैं…”

दरम्यान, आपल्या ट्वीटमध्ये सचिन सावंत यांनी मोदींचा वेताळ वेगळा असल्याचं म्हटलं आहे. “तू बोला मैं चला” नव्हे “तू बोला मैं आया”! भाजपा नेत्यांचा खांदा याला चालत नाही. वर्षानुवर्षे तो वेताळ झाडाला लटके. या वेताळाचा तपासही लटकलेला राहतो”, असं सावंत ट्वीटमध्ये म्हणाले आहेत.

“हा वेताळ HDIL च्या खांद्यावर बसणार नाही”

दरम्यान, मोदींचा वेताळ एचडीआयएलच्या खांद्यावर बसणार नाही, असा खोचक टोला देखील सावंत यांनी या ट्वीटमध्ये लगावला आहे. संजय राऊत मोदी सरकार विरोधात बोलले. (त्यांच्या) भावाला लगेच अटक! १ जाने २०२१ रोजी प्रवीण राऊतांची मालमत्ता जप्त केली. मग तपास वर्षभर का लटकवला? याच HDIL ने भाजपला ₹२० कोटींची देणगी दिली. त्यांच्या खांद्यावर बसणार नाही”, असं ट्वीटमध्ये सावंत यांनी म्हटलं आहे.

गोरेगावमधील पुनर्विकास प्रकल्पाच्या प्रकरणात आर्थिक गैरव्यवहार केल्याच्या आरोपाखाली इडीनं संजय राऊत यांचे बंधू प्रविण राऊत यांना अटक केली आहे. बुधवारी त्यांना न्यायालयात हजर केले असता ९ फेब्रुवारीपर्यंत त्यांना ईडीच्या कोठडीत ठेवण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. संजय राऊत यांनी देखील आज सकाळी आपल्या ट्विटर हँडलवरून एक सूचक ट्वीट केलं आहे.

Story img Loader