ठाकरे गटाने लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीवरुन काँग्रेसने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. बाळासाहेब थोरात आणि विजय वडेट्टीवार यांनी सांगली आणि धारावीतल्या जागांवर उद्धव ठाकरेंना थेट आघाडी धर्म पाळला नाही असं म्हणत आठवण करुन दिली आहे. तसंच या जागांचा पुनर्विचार करण्याचा सल्ला दिला आहे. तर संजय निरुपम यांनी अमोल किर्तीकर यांना खिचडी चोर संबोधलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काय म्हटलं आहे संजय निरुपम यांनी?

अमोल किर्तीकर खिचडीचोर आहेत. मुंबई उत्तर पश्चिम मतदार संघातून त्यांना उमेदवारी कशी दिली? उद्धव ठाकरेंनी आघाडीचा धर्म पाळला नाही. एवढंच काय तर खिचडी चोराला उमेदवारी दिलीच कशी असा प्रश्न विचारला आहे. इतकंच काय आम्ही खिचडी चोराचा प्रचार करणार नाही काही प्रश्नच येत नाही असा आक्रमक पवित्रा संजय निरुपम यांनी घेत ठाकरे गटावर जोरदार टीका केली आहे.

संजय निरुपम अमोल किर्तीकरांना खिचडी चोर का म्हणाले?

संजय निरुपम यांनी अमोल किर्तीकरांना खिचडी चोर म्हटलं कारण करोना काळात गरीबांना खिचडी देण्याचं जे कंत्राट आहे त्यात अमोल किर्तीकरांनी आर्थिक अफरातफर केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. त्यामुळेच त्यांना ईडीचं समन्सही पाटवण्यात आलं आहे. ठाकरे गटाने १७ नावांची यादी जाहीर केली. मात्र त्यातल्या सांगलीच्या चंद्रहार पाटील यांच्या नावावरुन आणि मुंबई उत्तर पश्चिम मधल्या अमोल किर्तीकरांच्या जागेवरुन काँग्रेसने नाराजी व्यक्त केली आहे.

हे पण वाचा- “उद्धव ठाकरेंनी आघाडी धर्म पाळला असता तर..”, ठाकरे गटाच्या यादीवर काँग्रेसची तीव्र नाराजी

संजय निरुपम म्हणाले की, उबाठा गटाने ज्यांची उमेदवारी जाहीर केली ते अमोल किर्तीकर हे भ्रष्टाचारातील आरोपी असून त्यांच्यावर ईडीने कारवाई केली आहे. करोना काळात मुंबई महानगरपालिकेने गरीब कामगारांना खिचडी वाटप करण्याचा एक चांगला उपक्रम सुरू केला होता. मात्र ठाकरे गटाच्या लोकांना हे खिचडी वाटप करण्याचे कंत्राट दिले गेले. या कंत्राटात कमिशन खाल्ल्याचा आरोप अमोल किर्तीकर यांच्यावर ठेवण्यात आला आहे. गरीब कामगारांची खिचडी खाणाऱ्या व्यक्तीला उमेदवारी का देण्यात आली आहे? असं म्हणत त्यांनी अमोल किर्तीकरांचा उल्लेख खिचडीचोर असा केला आणि उद्धव ठाकरेंवर टीका केली. आता निरुपम यांना ठाकरे गटाकडून उत्तर दिलं जातं का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress leader sanjay nirupam called uddhav thackeray candidate khichadi chor also said he did violation of alliance dharma scj