सोलापूर महापालिकेच्या महापौरपदी काँग्रेसच्या प्रा. सुशीला आबुटे यांची बहुमताने निवड झाली. त्यांनी आपल्या प्रतिस्पर्धी भाजपच्या नरसूबाई गदवालकर यांचा ६२ विरूध्द ३२ मतांनी पराभव केला. तर उपमहापौरपदी राष्ट्रवादीचे प्रवीण डोंगरे हे निवडून आले. त्यांनी आपल्या प्रतिस्पर्धी शिवसेनेच्या मेनका चव्हाण यांचा ६२ विरूध्द ३२ मतफरकाने पराभव केला.

Story img Loader