आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या राजकीय नेत्यांचे विविध ठिकाणी दौरे सुरु असून मतदारसंघाचा आढावा घेण्यात येत आहे. मात्र, निवडणुकीच्या आधी राज्याच्या राजकारणात सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोपाचं राजकारण सुरु आहे. आता काँग्रेसचे नेते तथा विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरील ७० हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्याच्या आरोपावरून विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी टीका केली. तसेच राज्य सरकारने सुरु केलेल्या लाडकी बहीण योजनेवरूनही विजय वडेट्टीवार यांनी महायुती सरकारवर हल्लाबोल केला. महाराष्ट्रात सर्वाधिक अत्याचाराच्या घटना घडत असल्याचंही त्यांनी म्हटलं.

narendra modi yogi adityanath campaign in maharashtra
लालकिल्ला : मोदी-योगींच्या प्रचाराने काय साधणार?
16 November Aries To Pisces Horoscope Today in Marathi
१६ नोव्हेंबर पंचांग: कृतिका नक्षत्रात मेषला शुभ दिवस,…
uddhav thackeray criticized amit shah
“गद्दारांनी गुवाहाटीचा डोंगर बघितला, आता त्यांना टकमक टोक दाखवायचंय”, उद्धव ठाकरेंची शहाजीबापू पाटलांवर घणाघाती टीका!
Amit Shah Malkapur, Chainsukh sancheti campaign,
मविआ म्हणजे विकास विरोधी आघाडी, गृहमंत्री अमित शहांचे टीकास्त्र; लाडक्या बहिणींना २१०० रुपये देणार
Devendra Fadnavis Dharni, Chikhaldara Skywalk Work,
‘चिखलदरा स्‍कायवॉकचे काम महाविकास आघाडीने थांबविले’, उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणीसांचा आरोप
Sanjay Raut and Mallikarjun Kharge
खरगेंच्या मुखी समर्थ रामदासांचा श्लोक, पण संजय राऊत निरुत्तर; जाहीरनामा प्रसिद्ध करताना नेमकं काय घडलं?
mallikarjun kharge replied pm narendra
“पंतप्रधान मोदी म्हणजे ‘झुटों के सरदार’, त्यांनी हेच लाल संविधान…”; ‘त्या’ टीकेला मल्लिकार्जून खरगेंचं प्रत्युत्तर!
BJP Manifesto For Election
BJP Manifesto : भाजपाच्या जाहीरनाम्यात लाडक्या बहिणींना २१०० रुपये देण्याचं आश्वासन , शेतकऱ्यांना कर्जमाफीसह ‘या’ घोषणा

हेही वाचा : Girish Mahajan : कॅबिनेट बैठकीत अजित पवार-गिरीश महाजनांमध्ये निधीवरून खडाजंगी? महाजन म्हणाले, “मी माझ्या खात्यासाठी…

विजय वडेट्टीवार काय म्हणाले?

“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अजित पवार यांच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाले, बेटा अजित कितना खाया? सरदार ७० हजार कोटी खाया. अरे क्या बात करता है! बहुत खाया, ये ले तिजोरी की चाबी रख”, अशा शब्दात विजय वडेट्टीवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची खिल्ली उडवली.

वडेट्टीवार पुढे म्हणाले, “भाजपा सरकारने महागाई गगनाला नेहून ठेवली. खाण्याचे तेल ६८ रुपये किलोने मिळत होतं. पण आज तेच तेल १५० रुपये किलो झालं आहे. सर्व वस्तुंवर मोठ्या प्रमाणात जीएसटी लावला. साडीवर १८ टक्के जीएसटी लावला आहे. माझी बहीण जर एक हजाराची साडी घेत असेल तर १८० रुपये जीएसटी द्यावा लागतो. आता लाडकी बहीण योजना आणता? महाराष्ट्रात सर्वाधिक आत्याचाराच्या घटना घडल्या आहेत. उत्तर प्रदेश आणि बिहारला महाराष्ट्राने मागे टाकले आहे. सरकारने आधी बहि‍णींचं संरक्षण केलं पाहिजे, हीच खरी लाडकी बहीण ठरेल”, असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.

मराठा आरक्षणावर वडेट्टीवार काय म्हणाले?

राज्यात गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणाचा प्रश्न चर्चेत आहे. यावर बोलताना वडेट्टीवार यांनी राज्य सरकारवर टीका केली. मराठ्यांना स्वतंत्र आरक्षण द्यायचं की ओबीसी कोट्यातून हा निर्णय राज्य सरकारने घ्यायचा आहे. मात्र, ते विधकांना बोलत का नाही, म्हणून विचारत आहेत. हे म्हणजे उलटा चोर वरून शिरजोर, असा प्रकार आहे. मुळात आरक्षणचा संपूर्ण गोंधळ राज्य सरकारने घातला आहे, तो त्यांनीच सोडवावा, असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.