राज्यातील शेतकरी आत्महत्यांवरुन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शिंदे सरकारवर टीकास्त्र डागलं आहे. हे सरकार गरीबांच्या टाळूवरील लोणी खाणारं सरकार असल्याचा हल्लाबोल पटोले यांनी केला आहे. राज्यात ओल्या दुष्काळामुळे अत्यंत विदारक परिस्थिती आहे. राज्यातील शिंदे-भाजपा सरकार असंवेदनशील आहे. त्यांच्या कृत्यामुळेच राज्यात शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण वाढल्याचा आरोप पटोले यांनी केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या कठीण काळात सरकारची साथ नसल्याची मानसिकता शेतकऱ्यांची झाल्याचे पटोले म्हणाले. विरोधी पक्षाच्या भूमिकेत असताना भाजपाने शेतकऱ्यांच्या आत्महत्या महाविकासआघाडी सरकारवर लादून गुन्हे दाखल करा, अशी मागणी केली होती. आता भाजपा सत्तेत असताना याच सरकार गुन्हे दाखल झाले पाहिजेत, अशी मागणी देखील पटोले यांनी केली. राज्यातील सरकार मलई खाणारं सरकार आहे. केंद्र सरकारनेही शेतकऱ्यांवर दुर्लक्ष केल्याने शेतकरी हवालदिल झाल्याचे पटोले यांनी विधानभवन परिसरात माध्यमांशी संवाद साधताना म्हटले.

“५० खोके, माजलेत बोके, एकदम ओके”, पवार-दानवेंच्या नेतृत्वात विधानभवनाबाहेर जोरदार घोषणाबाजी

ओल्या दुष्काळामुळे राज्यात शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं आहे. तात्काळ पंचनामा करून या शेतकऱ्यांना भरीव मदत द्यावी, अशी मागणी पटोले यांनी केली आहे. राज्यातील प्रश्नांवर उत्तर देण्यास सरकार टाळाटाळ करत असल्याचा आरोपही पटोले यांनी केला.

राज्यातून कृषी निर्यात २२ टक्क्यांनी वाढली; द्राक्षे आणि केळीचा वाटा सर्वाधिक

दरम्यान, रविवारी नांदेडमध्ये काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी शेतकऱ्यांच्या समस्यांसदर्भात कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांची भेट घेतली होती. पीक विमा कंपन्या शेती नुकसानाचे त्यांच्यामार्फत केलेले पंचनामेच ग्राह्य धरतात, सरकारच्या पंचनाम्यांना नाकारतात, अशी तक्रार चव्हाणांनी कृषीमंत्र्यांकडे केली. शेतकऱ्यांना मोबदलाही पीक विमा कंपन्यांच्या पंचनाम्यानुसारच दिला जातो, असेही चव्हाण यावेळी म्हणाले. या विमा कंपन्यांवर कारवाई करण्याची मागणी अशोक चव्हाणांकडून करण्यात आली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress maharashtra president nana patole criticized eknath shinde government on farmer suicide rvs