राज्यात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये सुरु असलेल्या आरोप-प्रत्यारोपाच्या फैरीमध्ये खालची पातळी गाठली आहे. त्यात आता भाजपा आमदार आणि राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या एका विधानाची महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

गुरुवारी पुण्याच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती झाल्यावर चंद्रकांत पाटील यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी हातकणंगले मतदारसंघातली निवडणूक आणि त्यावेळी झालेल्या आरोप-प्रत्यारोपांविषयी भाष्य केलं. “हातकणंगल्यात रोज उठून राजू शेट्टी मोदींना शिव्या द्यायचे. माझे खूप चांगले मित्र आहेत. म्हटलं तुम्ही चूक करताय. आई-वडिलांना शिव्या द्या चालेल. आईवरुन शिव्या देणं आमची कोल्हापूरची पद्धत आहे. पण, मोदी आणि शाहांना शिव्या देणं सहन करु शकत नाही”, असं चंद्रकांत पाटील म्हणाले होते.

हेही वाचा – ब्राह्मणांसंदर्भातील मोहन भागवतांच्या मताशी शरद पवार सहमत; म्हणाले, “समाजातील काही घटकांना…”

या विधानावरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी चंद्रकांत पाटील यांचा समाचार घेतला आहे. “चंद्रकांत पाटील बोलले ही कोणती हिंदू संस्कृती आहे. हिंदू, शीख, मुस्लिम यांच्यासाठी आई-वडील श्रेष्ठ आहेत. ज्यांनी जन्म घातला, त्यांच्या अभिमान असला पाहिजे, त्यांचं रक्षण करण्याची जबाबदारी मुलांवर असते. स्वार्थासाठी सगळं राजकारण चाललं आहे. हिंदू-हिंदू करत हिंदूंची मते घ्यायची आणि सत्तेसाठी दिल्लीच्या तख्तासमोर शरणागती जाणारा महाराष्ट्र नाही,” असे नाना पटोलेंनी म्हटलं.