गेल्या काही दिवसांपासून अजित पवार मुख्यमंत्री होणार असल्याची चर्चा सुरु आहे. पण, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या चर्चांना सोमवारी पूर्णविराम दिला. एकनाथ शिंदे हेच महायुतीचे मुख्यमंत्री असतील, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. मात्र, एकनाथ शिंदे अपात्र होत अजित पवार मुख्यमंत्री होतील, असा दावा काँग्रेसचे आमदार अभिजीत वंजारी यांनी केला आहे. ते विधिमंडळ परिसरात ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलत होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अभिजीत वंजारी म्हणाले, “एकनाथ शिंदे यांनी सहकुटुंब पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. पंतप्रधानांना एखाद्या राज्याचे मुख्यमंत्री भेटणं हे चुकीचं नाही. पण, कुटुंबाबरोबर भेटल्यानंतर निरोप समारंभ तर नव्हता ना? अशी चर्चा सर्व आमदारांमध्ये होत आहे.”

हेही वाचा : VIDEO : “टोल नाका फोडणे म्हणजे राजकारण नाही, कधीतरी…”, भाजपाचा थेट अमित ठाकरेंवर हल्लाबोल

“विधानसभा अध्यक्षांना सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार कार्यवाही करावी लागणार आहे. त्या निर्णयानंतर एकनाथ शिंदे अपात्र होतील. मग, अजित पवार यांना मुख्यमंत्री केलं जाईल,” असे अभिजीत वंजारी यांनी सांगितलं.

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

“एकनाथ शिंदे हेच महायुतीचे मुख्यमंत्री राहणार आहेत. मुख्यमंत्रीपदामध्ये कोणताही बदल होणार नाही. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना त्याची पूर्णपणे स्पष्ट कल्पना देण्यात आली आहे,” असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं होतं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress mla abhijieet vanjari on eknath shinde and ajit pawar cm ssa