माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी नुकेतच भापजात प्रवेश केला आहे. त्यानंतर भाजपाने त्यांना राज्यसभेची उमेदवारी दिली आहे. चव्हाण हे चार दशकांपासून काँग्रेस पक्षात होते. काँग्रेसमध्ये त्यांची वरिष्ठ नेत्यांत गणना व्हायची. मात्र त्यांनी भाजपात प्रवेश केल्यामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. त्यानंतर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बानवकुळे यांनी मोठे विधान केले होते. या विधानानंतर लातूरचे काँग्रेसचे नेते तथा आमदार अमित देशमुख हेदेखील भाजपात जाणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात होता. यावरच खुद्द देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली. ते ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलत होते.

“…त्याचे उत्तर मी देऊ शकत नाही”

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी अशोक चव्हाणांच्या भाजपा प्रवेशानंतर नांदेड आणि लातूर जिल्ह्यातील अनेक नेते भाजपात प्रवेश करणार आहेत, असे विधान केले होते. त्यांच्या या विधानानंतर अमित देशमुख भाजपात जाणार का? असे विचारले जात होते. त्यावर अमित देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली आहे. माझ्याबाबतीत अशा प्रकारची चर्चा का पसरवण्यात आली, ते बावनकुळे यांनाच विचारायला हवे, असे ते म्हणालेत. “आमची अशा प्रकारची चर्चा का होत आहे, त्याचे उत्तर मी देश शकत नाही. चंद्रशेखर बावनकुळे यांनी नांदेड आणि लातूरच्या नेत्यांचा उल्लेख केला, त्यात कोणत्या नेत्यांचा समावेश आहे हे त्यांनाच विचारायला पाहिजे,” असे अमित देशमुख यांनी स्पष्ट केले.

saif ali khan threat inter religion marriage
आंतरधर्मीय विवाहामुळे सैफ अली खानला मिळाल्या होत्या धमक्या; स्वतः खुलासा करत म्हणालेला, “आमच्या घराजवळ…”
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Sanjay singh
Sanjay Singh: आपचे राष्ट्रीय प्रवक्ते संजय सिंह म्हणतात, “हम ना बटेंगे ना कटेंगे; हम भाजप को लपेटेंगे”
Lakhat Ek Aamcha Dada
चांगले वागण्याचे नाटक करून डॅडींचा सूर्याला फसविण्याचा प्लॅन; प्रोमो पाहताच नेटकरी म्हणाले, “तुमचं पोरगं आणि तुम्ही…”
devendra fadnavis criticize sanjay raut in nagpur
“संजय राऊतांसारख्या लोकांना मी…”, देवेंद्र फडणवीस यांची टीका; म्हणाले, “ते माझ्या उंचीचे…”
sharad pawar reaction on bjp batenge to katenge slogan
भाजपाच्या ‘बटेंगे तो कटेंगे’ घोषणेवरून शरद पवारांचा हल्लाबोल; म्हणाले, “सत्ताधाऱ्यांची मानसिकता…”
Ajit Pawar on Amit Shah
‘देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री?’, अमित शाहांच्या त्या विधानावर अजित पवारांचं मोठं विधान; म्हणाले, “निवडणूक झाल्यावर…”
maharashtra assembly election 2024 mla mahesh landge warns opposition
पिंपरी- चिंचवड: लांडगे संतापले; “कार्यकर्त्यांला त्रास दिल्यास वीस तारखेनंतर चा महेश लांडगे डोळ्यासमोर ठेवा”; शांततेचा अंत…

“भाजपात येण्याचा निर्णय हा माझा व्यक्तिगत निर्णय”

दरम्यान, भाजपा प्रवेशानंतर अशोक चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली होती. हा माझा वैयक्तिक निर्णय आहे. तसेच मी भाजपाकडे कोणतीही मागणी केलेली नाही, असे अशोक चव्हाण म्हणाले होते. “मी जिथे होतो तिथेही प्रामाणिकपणे काम केलं आहे. आजपासून भाजपात आलो आहे इथेही प्रामाणिकपणेच आणि निष्ठेने काम करणार आहे. माझा जो अनुभव आहे त्यातून भाजपाला जास्तीत जास्त जागा कशा मिळतील यासाठी प्रयत्न करणार आहे. मी पक्ष सोडल्यावर अनेक लोक विरोधात बोलत आहेत. व्यक्तिगत स्वरुपाचे दोषारोप मी कुणावर केले नाहीत आणि करणारही नाही. भाजपात येण्याचा निर्णय हा माझा व्यक्तिगत निर्णय आहे. मला कुणीही जा सांगितलेलं नव्हतं. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींची सबका साथ सबका विकास ही भूमिका पटल्याने मी भाजपात आलो आहे.” असे अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केले होते.

आणखी नेते भाजपात जाणार का ?

दरम्यान, अशोक चव्हाण यांच्या भाजपाप्रवेशानंतर काँग्रेसचे आणखी काही आमदार भाजपात जाणार आहेत, असे म्हटले जात आहे. तसा दावा भाजपाकडून केला जातोय. त्यामुळे आगामी काळात नेमके काय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.